एसटी बस न आल्याने खाजगी वाहनातून प्रवास करताना टमटम पलटी, शाळेतील 16 विद्यार्थी जखमी
संतप्त ग्रामस्थ व पालकांनी खर्डा बस स्थानकास लावले कुलूप
जामखेड प्रतिनिधी
खर्डा बस स्थानकात शाळा सुटल्यानंतर जामखेड, ईट ही बस न आल्याने मुंगेवाडी व पखरुड येथील 30 विद्यार्थी खाजगी टमटम मधून घरी जात असताना ड्रायव्हरचा टमटम वरील ताबा सुटून सदरचा टेम्पो हा बेलेश्वर फाटा या ठिकाणी पलटी झाल्याने यामधील 16 शालेय विद्यार्थी जखमी झाले आहेत. तर चार विद्यार्थी हे गंभीर जखमी झाल्याचे प्रत्यक्ष दर्शनी सांगितले आहे.
या अपघाताची माहिती कळताच संतप्त ग्रामस्थ व पालकांनी खर्डा बस स्थानकास कुलूप लावून एसटी महामंडळाचा निषेध व्यक्त केला.