रोखठोक जामखेड…. 

जामखेड तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आसल्याने आरोळे हॉस्पिटल येथील कोविड सेंटरला मदतीचा ओघ सुरू झाला आहे. याच अनुषंगाने अहमदनगर चे प्रसिद्ध डॉ. दमन काशिद यांनी ग्रामीण आरोग्य प्रकल्प (आरोळे हॉस्पिटल) येथील कोविड सेंटरला साहीत्य खरेदी करण्यासाठी 51 हजार रुपयांची मदत केली.

जामखेड चे भुमीपुत्र आसलेले प्रसिद्ध डॉ दमन काशिद यांचे अहमदनगर येथे स्वतःचे हॉस्पिटल सुरू आहे. मात्र आपणही समाज्याचे देणे लागतो याच अनुषंगाने त्यांनी ही मदत केली आहे. त्यांचे सहकारी मित्र अजय कोठारी व ग्रामीण आरोग्य प्रकल्प अंतर्गत चालणारे आरोळे हॉस्पिटल चे खुप जुने नाते आहे. कोठारी यांनी देखील अनेक वेळा आरोळे हॉस्पिटलला मदत केली आहे. मात्र सध्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आसल्याने त्यांनी ही गोष्ट त्यांचे मित्र व जामखेड चे भुमीपुत्र डॉ दमन काशिद यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी देखील घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने जामखेड चे व्यापारी अजय कोठारी यांच्या मदतीने कोविड सेंटरला साहीत्य खरेदीसाठी 51 हजार रुपयांची आर्थिक मदत केली. त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कैतुक होत आहे.

आरोळे हॉस्पिटल चे संचालक डॉ. रवीदादा आरोळे व शोभाताई आरोळे यांनी आज पर्यंत प्रशासनाच्या व दानशूर नागरिकांच्या मदतीने तीन हजार पेक्षाही जास्त कोरोनाग्रस्त रुग्णांवर मोफत उपचार केले आहेत. आज परत एकदा त्यांना आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. त्यामुळे तालुक्यातील दानशूर व्यक्तींनी आरोळे हॉस्पिटल ला आर्थिक मदत करण्याची अवश्यकता आहे.

3 COMMENTS

  1. Good day!
    I know this is somewhat off topic but I was wondering if you knew where I could locate a captcha plugin for
    my
    comment form? I’m using the same blog platform as yours and
    I’m having problems finding one?
    Thanks a lot!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here