अखेर जामखेडला उपजिल्हा रुग्णालय मंजूर
आ. रोहित पवार यांच्या प्रयत्नांना यश
जामखेड रोखठोक….
वाढती लोकसंख्या व वाढत्या अपघातांमुळे जामखेड येथे उपजिल्हा रुग्णालयाची गरज लक्षात घेता कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून नुकतेच ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी समाध व्यक्त केले आहे.
तीन जिल्ह्याच्या सीमेवर असणारे व मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून जामखेडची ओळख आहे. येथील व्यापारी पेठ व बाजारपेठ मोठी असल्याने तीन जिल्ह्य़ातील लोकांचा मोठ्या प्रमाणावर वावर जामखेड शहरात असतो. अपघाताचे प्रमाणही मोठे आहे. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालय असावे अशी मागणी अनेक वर्षांपासून होत होती आमदार रोहित पवार यांनी यात लक्ष घातले व उपजिल्हा रुग्णालयास मान्यता मिळवली आहे. यामुळे परिसरातील जनतेने समाधान व्यक्त केले आहे. पुर्वी जामखेडला तीस बेडची क्षमता असलेले, तालुका ग्रामीण रुग्णालय सध्या कार्यन्वित आहे, जिल्हा रुग्णालय ते तालुका रुग्णालय हे अंतर जास्त असल्या करणाने, त्यास वाढत्या वैद्यकीय सेवा देण्यात मर्यादा येत होत्या, तालुक्याच्या व शहराच्या वाढत्या आरोग्य विषयक गरजा लक्षात घेऊन गेल्या काही वर्षां पासून बेडची संख्या वाढवावी ही मागणी, जनतेकडून होत होती. ही प्रमुख बाब लक्षात घेऊन विद्यमान कार्यसम्राट आमदार, रोहितदादा पवार यांनी, पाठपुरावा करून, आरोग्य सेवा आयुक्तालयाकडून, शंभर बेडचे उपजिल्हारूग्णालय मंजूर करून घेतलेले पत्र, आज रोजी प्रकाशित केले आहे, जागा अधिग्रहीत करने बांधकाम करणे व पदनिर्मिती करणे याबाबत स्वतंत्र कार्यवाही करण्यात येईल असेही वर्तीवले आहे.
जामखेड तालुका हा जिल्ह्याचे पूर्वेकडील शेवटचे टोक, बीड, उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्य लगत, असलेला तालुका, ग्रामीण रुग्णालयापासून जिल्हा रुग्णालय, जवळ जवळ 80 किमी पेक्षा जास्त अंतर आणि 2 तासाचा प्रवास या मुळे रुग्णाचे हाल होत होते. जिल्हा रुग्णालय अंतर जादा असल्या करणाने , रुग्णांना तात्काळ सेवा मिळावी म्हणून, रुग्णाचे नातेवाईक रुग्णांना स्थानिक खाजगी रुग्णालयात ऍडमिट करत होते, त्यामुळे जामखेडला टोलेजंग झालेले खाजगी दवाखाने, रुग्णाकडून लाखोंचे बिल घेऊन सामान्य जनतेची आर्थिक हेळसांड करताना दिसतात, या सर्व आरोग्य गरजा पाहता, स्थानिक आमदार रोहित दादा पवार यांच्या कडून घेतलेला हा निर्णय सर्वसामान्य जनतेला खूप आशादायक ठरलेला आहे.