रोखठोक अहमदनगर… 

 नगर जिल्ह्यात करोनाचे थैमान कायम असून सलग पाचव्या दिवशी एक हजाराहून नवीन बाधित आढळून आले आहेत. मागील चोवीस तासात जिल्ह्यात तब्बल 1319 नवीन रूग्णांची भर पडली आहे. यात सर्वाधिक रूग्ण नगर शहरात आढळून आले आहेत. नगर शहरात चोवीस तासात 362 बाधितांची भर पडली आहे.

अहमदनगर शहर 362, राहाता 63, संगमनेर 64, श्रीरामपूर 91, नेवासे 100, नगर तालुका 58, पाथर्डी 65, अकोले 63, कोपरगाव 144, कर्जत 50, पारनेर 28, राहुरी 51, भिंगार 39, शेवगाव 53, जामखेड 32, श्रीगोंदे 34, मिलीटरी हॉस्पिटल 2, आणि इतर जिल्ह्यातील 20 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले. जिल्हा रुग्णालयानुसार 447, खाजगी प्रयोगशाळेनुसार 400 आणि रॅपिड चाचणीमध्ये 472 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here