Home राजकारण आ. रोहीत (दादा) पवार यांच्या निवडीबद्दल जामखेड शहरात रविवारी काढणार विजय मिरवणुक...

आ. रोहीत (दादा) पवार यांच्या निवडीबद्दल जामखेड शहरात रविवारी काढणार विजय मिरवणुक रॅली

आ. रोहीत (दादा) पवार यांच्या निवडीबद्दल जामखेड शहरात रविवारी काढणार विजय मिरवणुक रॅली
जामखेड प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीमध्ये कर्जत-जामखेड मतदारसंघातील उमेदवार आ. रोहीत (दादा) पवार हे निवडुन आल्यानंतर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला होता. याच अनुषंगाने रविवार दि १ डिसेंबर रोजी दुपारी जामखेड शहरातुन भव्य विजयी मिरवणूक रॅली आ. रोहीत दादा पवार मित्र मंडळाच्या वतीने काढण्यात येणार आहे.
याबाबत जामखेड येथे आज गुरुवार दि २८ नोव्हेंबर रोजी सकाळी कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत विजय मिरवणूक रॅली निमित्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व बूथ सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. रविवार दि १ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता विंचरणा नदीवरील शंकराच्या मुर्ती पासुन या विजयी रॅलीस सुरवात होणार आहे. ही रॅली खर्डा चौक, बीड कॉर्नर, बीडरोड मार्गे मार्केटयार्ड येथिल गणपती मंदिर याठिकाणी रॅलीची सांगता होणार आहे. तरी या विजयी रॅलीस जामखेड तालुक्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते, नागरीक व महीलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आ. रोहीत (दादा) पवार मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!