अहमदनगर रोखठोक…..

काेराेनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शाळा बंद करण्याचानिर्णय आज घेण्यात आलेल्याची माहिती जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भाेसले यांनी दिली.

यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षिरसागर, महापालिकेचे आयुक्त शंकर गोरे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील काेराेना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आढावा बैठकीचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यानंतर आयाेजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. जिल्ह्यातील फक्त आता दहावी व बारावीचे वर्ग सुरु राहणार असून इतर वर्ग बंद राहणार आहेत. पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, लसीकरणासाठी केंद्र सरकारने वयाची अट काढून टाकणे गरजेचे आहे. लसीकरण बंधनकारक करावे, अशी मागणी आपण करणार असल्याचे म्हणाले.

जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी करोना प्रतिबंध उपाययोजनांबाबत सांगितले की, दहावी व बारावी वगळता सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत गर्दी टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व हॉटेल, रेस्टॉरंट रात्री आठनंतर पूर्ण बंद राहणार असून यावेळी पार्सल सुविधा देखील बंद ठेवण्यात येणार आहेत.

मागील वर्षी काेराेनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शाळा बंद करण्यात आलेल्या हाेत्या. त्यामळे विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पास करण्यात आले हाेते. यंदाही पहिली ते नववीपर्यंतच्या परीक्षा हाेणार की नाही, असा प्रश्न आता पालकांमधून उपस्थित केला जात आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here