Home ताज्या बातम्या नागरीकांनो काळजी घ्या! प्रशासनाचे आवाहन जामखेड तालुक्यात यलो अलर्ट जारी
नागरीकांनो काळजी घ्या! प्रशासनाचे आवाहन जामखेड तालुक्यात यलो अलर्ट जारी
वादळी वाऱ्यासह पाऊसाची शक्यता, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालक्यातील विंचरना, सिना, खैरी, मांजरा व मोहरी इतर नदी व तलाव क्षेत्रात जोरदार पाऊस चालु आहे. महसूल व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने आहील्यानगर जिल्ह्यासह जामखेड तालुक्यात येलो अलर्ट घोषीत केला आहे. त्यामुळे तालुक्यातील नदीकाठावरील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. त्यामुळे नागरीकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच नैसर्गिक आपत्ती आल्यास आपत्कालीन स्थितीत जवळचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन तहसिलदार गणेश माळी व पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी संयुक्तरीत्या केले आहे.
याबाबत जाहीर करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, अहिल्यानगर जिल्ह्यासाठी हवामान खात्याद्वारे जारी करण्यात आलेल्या यलो अलर्टच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे व तालुका प्रशासनातर्फे जिल्ह्यातील तसेच जामखेड तालुक्यातील तमाम नागरिकांना खालील प्रमाणे दक्षता घेणेबाबत आवाहन करण्यात येत आहे. भारतीय हवामान खात्याद्वारे निर्गमित संदेशानुसार अहिल्यानगर जिल्ह्यात दि. २० ऑक्टोबर २०२४ ते २२ ऑक्टोबर २०२४ रोजी वीजांच्या कडकडाटांसह वादळी वारा व अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आलेली असून अहिल्यानगर जिल्ह्यासाठी “ऑरेंज अलर्ट” जारी करण्यात आलेला आहे. या तारखे दरम्यान वीजांच्या कडकडाटांसह वादळी वारा व हलक्या ते मध्यम स्वरुपाच पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यासाठी “येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.
पुणे, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यात पर्जन्यमान झाल्यास अहिल्यानगर जिल्ह्याताल भिमा व घोड नदी, गोदावरी नदी तसेच प्रवरा व मुळा या नद्यांवरील धरणातून सोडलेल्या विसर्गामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊ शकते. तसेच जामखेड तालक्यातील विंचरना, सिना, खैरी, मार्जरा मोहरी इतर नदी व तलाव क्षेत्रात जोरदार पाऊस चालु आहे त्यामुळे सदर नदीकाठावरील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. हवामान खात्याद्वारे अहिल्यानगर जिल्ह्यासाठी जारी करण्यात आलेल्या यलो अलर्टच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे व तालुका प्रशासनातर्फे जिल्ह्यातील तसेच जामखेड तालुक्यातील नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
याबाबत सबंधीत ग्रामपंचायतीने व ग्रामस्तरीय समितीने (ग्रामसेवक तलाठी, कृषी सहा. पोलिस पाटील) योग्य ती खबरदारी घेऊन आपत्ती कालिन परीस्थितीसाठी तयार राहून योग्य तो समन्वय साधावा नागरीकांची जिवीतहानी व मालमत्तेचे नुकसान होणार जाही याची दक्षता घ्यावी. असे आवाहन तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जामखेडचे प्रमुख तहसिलदार गणेश माळी यांनी केले आहे. तसेच याबाबत सतर्क राहावे असे आदेश मुख्याधिकारी नगरपरीषद जामखेड, ग्रामसेवक तलाठी, कृषी सहा, पोलिस पाटील सर्वसबंधीत गावे विंचरना नदीकाठचे गावे 1. जामखेड, 2. रत्नापूर, 3. वंजारवाडी, 4. फक्राबाद, 5. पिंपरखेड, सिना नदी काठ गावे 1. गिरवली, 2. कवडगांव, 3. चोंडी, 4. जवळा, खैरी नदीकाठ गावे – 1. तरडगावं. 2. सोनेगांव, 3. धनेगांव, मांजरा नदीकाठसाठी 1. माळेवाडी, 2. दिघोळ, 3. जातेगांव. मोहरी तलाव नदीकाठ गावे 1. खर्डा, जायभायवाडी. यांना पाठवण्यात आले आहेत.
error: Content is protected !!