स्व. देवराव दिगांबर वराट काॅलेज ऑफ फार्मसी साकत येथे नवीन बी फार्मसी पदवी अभ्यासक्रमास मान्यता
संत ज्ञानेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या स्व. देवराव दिगांबर वराट कॉलेज ऑफ फार्मसी साकत येथे डि फार्मसी अभ्यासक्रम सुरू आहे या संस्थेत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून नवीन बी फार्मसी पदवी अभ्यासक्रमास फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया नवी दिल्ली यांच्या कडून मान्यता मिळालेली आहे. बी फार्मसी अभ्यासक्रमास ६० विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे. बी फार्मसी अभ्यासक्रम हा चार वर्षाचा आहे. या काॅलेज मुळे जामखेड परिसरातील विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक पदवी शिक्षणाची संधी प्राप्त झाली आहे.

स्व. देवराव दिगांबर वराट काॅलेज ऑफ फार्मसी साकत मध्ये बी फार्मसीची प्रवेश प्रक्रिया दि. २५ आक्टोबर पासून सुरू होत आहे. सदर प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण मंडळाच्या नियमानुसार त्यांच्या वेबसाइटवर सुरू होणार आहे. तसेच शासनाच्या नियमानुसार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरूण वराट यांनी दिली.

साकत सारख्या दुर्गम भागात प्रा. अरूण वराट व कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांनी बारा वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वर बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या माध्यमातून साकेश्वर सायन्स ज्युनियर कॉलेज साकत व जय हनुमान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोल्हेवाडी सुरू केले आज मोठा वटवृक्ष निर्माण झाला आहे. यातच आता स्व. दिगंबर देवराव वराट काॅलेज आँफ फार्मसी माध्यमातून डी फार्मसी व बी फार्मसी पदवी अभ्यासक्रमाची भर पडली आहे. यामुळे हजारो विद्यार्थ्यांना या शिक्षण संस्थेमुळे फायदा होत आहे.
मागील वर्षी डी फार्मसी प्रथम वर्षांचा निकाल 95 टक्के लागलेला आहे. तरी डी फार्मसी व बी फार्मसी पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here