डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील जयंती मिरवणूक जामखेड मध्ये उत्साहात संपन्न
जामखेड प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक
पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 137 व्या जयंती निमित्त जामखेड शहरातून मिरवणूक काढण्यात आली. रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश संकुलामध्ये कर्मवीर रथ पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
यावेळी प्रमुख उपस्थिती स्थानिक स्कूल कमिटीची ज्येष्ठ सदस्य हरिभाऊ बेलेकर, राजेंद्र कोठारी, प्रा मधुकर राळेभात, विनायक राऊत, सुरेश भोसले, प्रकाश सदाफुले, शिवाजीराव ढाळे, प्राचार्य मडके बी के, मुख्याध्यापिका सौ चौधरी के डी, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष अमोल बहिर, पर्यवेक्षक कोकाटे व्ही के, पर्यवेक्षक संजय हजारे, गुरुकुल प्रमुख संतोष ससाने, साळुंखे बी एस, रघुनाथ मोहळकर, कुंडल राळेभात, प्रा. विनोद सासवडकर, प्रा. कैलास वायकर, मोहन यादव, रयत सेवक व, नागेश विद्यालय, ज्यूनियर कॉलेज, कन्या विद्यालय, एनसीसी कॅडेट विद्यार्थी विद्यार्थिनी पालक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मिरवणुकीमध्ये कर्मवीर रथ, एनसीसीचे ध्वज पथक, मुलांचे लेझीम पथक, झांज पथक, कर्मवीर दिंडी, मुलींचे कलश पथक, टिपरी पथक, लेझीम पथक तसेच ढोल पथक आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. मिरवणुकीची रांग पाऊण किलोमीटर होती. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने कर्मवीर जयंती मिरवणूक निघाल्याने जामखेड करांनी कौतुक केले.
मिरवणूक मार्ग -नागेश विद्यालय -आदित्य मंगल कार्यालय कॉर्नर -बीड रोड- बीड कॉर्नर -छत्रपती शिवाजी महाराज पेठ- जय हिंद चौक -खर्डा चौक -तपनेश्वर रोड- डॉ आंबेडकर चौक- नागेश विद्यालय यामार्गाने काढण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी विविध ठिकाणी कर्मवीर रथाचे पूजन करण्यात आले. कर्मवीर भाऊराव पाटलांचा विजय असो, रयतेचा राजा कर्मवीर माझा, स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद, रयत शिक्षण संस्थेचा विजय असो अश्या घोषणेने परिसर दुमदुमून निघाला.
कला शिक्षक मयुर भोसले, संभाजी इंगळे, श्रीम लोंढे एस ए, श्रीम साठे एस आर, सौ पोकळे जे एम, सौ साळुंके एम बी, सौ गायकवाड बी डी यांनी विविध पथकांचे नियोजन केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता नागेश विद्यालय व कन्या विद्यालयातील सर्व शिक्षक स्टाफ यांनी परिश्रम घेतले.