जामखेड येथे पाळण्यात आलेल्या बंदला शंभर टक्के प्रतिसाद
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला समर्थनार्थ पुकारला होता बंद.
जामखेड प्रतिनिधी

मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे. मात्र तरी देखिल सरकारने याबाबत दखल घेतली नाही. याबाबत अहमदनगर जिल्ह्यात आज बंद पुकारण्यात आला होता. याच अनुषंगाने जामखेड तालुक्यात देखील अखंड मराठा समाज जामखेडच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला होता. या बंदला नागरिक व व्यापार्‍यांनी शंभर प्रतिसाद देत आपली दुकाने बंद ठेवली होती.

मराठा समाजाला आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकारकडून वारंवार शब्द देऊन चालढकल केली जात आहे. त्यामुळे मराठा आरक्षण संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाचा त्यांचा आजचा सातवा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे तरी देखील सरकारला जाग येत नाही. आज सोमवार दि 23 सप्टेंबर रोजी अहमदनगर जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. यामुळे जामखेड तालुका व शहरात अखंड मराठा समाज जामखेडच्या वतीने बंद पुकारण्यात आला होता.
सकाळ पासूनच व्यापार्‍यांनी बंदला पाठिंबा देत उत्पुर्तपणे बाजारपेठ बंद ठेवली होती. यानंतर सकाळी प्रशासनाच्या निषेधार्थ शेकडो मराठा बांधवांच्या वतीने जामखेड शहरातुन मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती. यानंतर सदरची रॅली तहसील कार्यालयासमोर आली यावेळी आनेक मराठा बांधव तहसीलदार गणेश माळी यांना निवेदन देण्यासाठी थांबले होते.
यावेळी संतप्त मराठा बांधवांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे गेल्या सात दिवसांपासून अंतरवली सराटी याठिकाणी आमरण उपोषणास बसले आहेत. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालली आहे, अजुनही हैदराबाद गॅझेट लागु केले नाही. तसेच मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात आले नाहीत, मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबातील सदस्यांना शासकीय नोकरी देण्यात यावी, प्रशासन आणि शासन मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यांच्या काही जिवाला धोका निर्माण झाल्यास त्याचा परीणाम सध्याच्या सरकार व प्रशासनास भोगावे लागतील. तसेच कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता सरकारने तातडीने मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा आशा भावना व्यक्त केल्या. यानंतर तहसीलदार गणेश माळी यांना मराठा बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले व दिवसभर शांततेत बंद पाळण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here