जामखेडचे डॉ. संजय भोरे अवार्ड ऑफ एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित.
जामखेड प्रतिनिधी
जामखेड येथील शैक्षणिक क्षेत्रात ठसा उमटवणारे डॉ. संजय भोरे यांना एस. के. एच मेडिकल कॉलेज बीडच्या सुवर्ण महोत्सवा निमित्त नुकतेच अवॉर्ड ऑफ एक्सलन्स यापुरस्कार ने सनम्मानित करण्यात आले.
महाविद्यालयाच्या प्रांगणात आदर्श शिक्षण संस्थेचे सचिव तथा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रती कुलगुरू डॉ मिलिंद निकुंभ, डॉ पिनांकिन त्रिवेदी राष्ट्रीय होमिओपॅथी आयोगाचे रजिस्ट्रेशन बोर्डाचे प्रेसिडेंट, राष्ट्रीय होमिओपॅथी आयोगाचे सचिव डॉ संजय गुप्ता, राष्ट्रीय आयोगाच्या मेडिकल असेसमेंट अँड रेटिंग बोर्डाचे सदस्य डॉ. आंनद चतुर्वेदी, राष्ट्रीय आयोगाच्या रजिस्ट्रेशन बोर्डाचे सदस्य डॉ.सेंथीलकुमार, महाराष्ट्र आयुष्यमान भारत यायोजनेचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. राजकुमार पाटील, कॉलेज चे सल्लागार डॉ. अरुण भस्मे, प्राचार्य डॉ. महेंद्र गौशाल यांच्या उपस्थितित मंत्री महोदय यांच्या हस्ते अवॉर्ड ऑफ एक्सलन्स यापुरस्कार ने सनम्मानित करण्यात आले.
या महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या व प्रथितयश संपादन केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांना मंत्री महोदयाच्या हस्ते अवॉर्ड ऑफ एक्सलन्स या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, या महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या 1974 ते 2024 या पन्नास वर्षातील डिप्लोमा, डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएट व पीएचडी झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
डॉ. संजय भोरे यांचे सामाजिक, शैक्षणिक, व आरोग्य क्षेत्रात खुप चांगले काम आहे. ते सनराईज मेडिकल & एज्युकेशन फौंडेशन चे संस्थापक अध्यक्ष आहेत, या अंतर्गत साहेबराव पाटील माध्यमिक विद्यालय पाडळी, स्व एम. ई भोरे ज्यनियर कॉलेज पाडळी, सनराईज इंग्लिश स्कूल पाडळी, संभाजीराजे ज्यु. कॉलेज देवदैठण, स्व. विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव, या शाखा कार्यरत आहेत
या अगोदर डॉ. संजय भोरे यांना राष्ट्रीय विकास रत्न अवॉर्ड (काठमांडू ), एंटरनॅशनल गोल्ड स्टार मिलिनियम अवॉर्ड दिल्ली, व इंदिरा गांधी सद्दभावना अवॉर्ड दिल्ली या पुरस्कार ने सन्मानित कारण्यात आले आहे.
डॉ. संजय भोरे यांचे आ. प्रा. राम शिंदे साहेब, सभापती डॉ. भगवनराव मुरूमकर, जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले यांनी अभिनंदन केले आहे.