ज्ञानराधा च्या ठेवीदारांना न्याय मिळावा म्हणून पोलीस अधीक्षकांना निवेदन, शनिवारी होणार रास्तारोको
जामखेड प्रतिनिधी
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेमध्ये ज्या ठेवीदारांचे पैसे अडकले आहेत त्यासर्व सभासदांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अहमदनगर यांना जामखेड तालुक्यातील गोरगरीब लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी जामखेड शहरातील समन्वय समिती यांनी निवेदन देवून विषयाची व्याप्ती लक्षात आणून दिली. तसेच शनिवारी जामखेड शहरातील खर्डा चौक या ठिकाणी ठेवीदार रास्तारोको आंदोलन करणार आहेत.
याबाबत सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनी सांगितले कि ज्यांचे पैसे अडकले आहेत त्यातील अनेक लोकांना आजारांनी ग्रासलेले आहे आसे सांगितले यावर पोलीस अधीक्षक यांनी सांगितले की लवकर हा गुन्हा जिल्ह्याला वर्ग करू आशी सकारात्मक चर्चा झाली. पुढे आजबे म्हणाले की आपल्याला या प्रकरणात नक्कीच न्याय मिळेल पण यासाठी सर्वांना एकत्र येणे आवश्यक आहे. त्यामुळे येत्या शनिवार दि 21 सप्टेंबर 2024 रोजी एकत्र येवू व जामखेड शहरातील खर्डा चौकात रास्तारोको आंदोलन करु. यासाठी हजारो ठेवीदारांनी उपस्थित रहाण्याचे अवहान देखील रमेश आजबे यांनी केले आहे.
पोलीस अधीक्षक यांना निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे, प्रमोद राऊत, सुतार सर
डॉ. प्रदीप कात्रजकर, संतोष शिंदे, संदीप गायकवाड, शिवलिंग राऊत, पिन्टू राळेभात उपस्थित होते. ज्ञानराधा को-आँप क्रेडीट सोसायटी जामखेड शाखेत जामखेड व परिसरातील ६ हजार ५०० ठेवीदारांचे ९० कोटी रुपयांच्या अडकल्या आहेत त्या लवकरात लवकर मिळाव्यात अशी मागणी ठेवीदारांच्या वतीने सातत्याने करण्यात येत आहे. तसेच दोन महिन्यांपूर्वी ज्ञानराधा पतसंस्थेवर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र अद्याप तो वर्ग करण्यात आला नाही. सुरेश कुटे त्याची पत्नी यांनी भाजपामध्ये प्रवेश केला म्हणून कारवाई केली जात नाही का असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
बीड येथील ज्ञानराधा मल्टिस्टे को-ऑप सोसायटीकडे कर्जत-जामखेड तालुक्यातील सुमारे साडेसहा हजारहून अधिक शेतकऱ्यांच्या ९० कोटी रुपयांहून अधिक ठेवी आहेत. परंतु या संस्थेकडून याठेवीदारांची फसवणूक झाली आहे. या संस्थेची चौकशी करुन कारवाई करावी आणि कर्जत- जामखेड मतदारसंघातील ठेवीदारांसह सर्वच ठेवीदारांचे पैसे परत मिळावेत यासाठी ही आ. रोहित पवार यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यामुळे ठेवीदारांमध्ये न्याय मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली होती.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर मोलमजुरी करण्याची वेळ
मुलांमुलींच्या उच्च शिक्षणासाठी तसेच लग्नासाठी विश्वासाने अनेकांनी सुरेश कुटे यांच्या ज्ञानराधा पतसंस्थेत आपल्या आयुष्याची पुंजी ठेवली, स्वतः च्या पोटाला चिमटा घेऊन, मोलमजुरी करून, सेवानिवृत्ती नंतर उर्वरित आयुष्य व्याजाच्या पैशावर गुजरान करावी म्हणून जामखेड परिसरातील ठेवीदारांनी ज्ञानराधा को – आँप क्रेडीट सोसायटी जामखेड शाखेत जामखेड व परिसरातील ६५०० ठेवीदारांचे ९० कोटी रुपये रूपये ठेव आहेत. त्या लवकरात लवकर मिळाव्यात अशी मागणी आहे.