गाडीच्या बॅटऱ्या चोरणारा अरोपी काही तासातच पोलीसांनी केला  जेरबंद
जामखेड प्रतिनिधी
भारत गॅस एजन्सी मधिल गॅसटाकी वाहतुक करणार्‍या दोन वाहनांच्या दोन बॅटऱ्या आज्ञात चोरट्यांन चोरुन नेल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपीस अटक करुन दोन्ही बॅटऱ्या आरोपीकडून हस्तगत केल्या आहेत.
भारत गॅस एजन्सी आरोळे हॉस्पिटल च्या पाठीमागे गॅस एजन्सी मधील गाडीच्या दोन बॅटऱ्या आज्ञात चोरान चोरी केल्याची फिर्याद सुरज बाळासाहेब पोकळे यांनी जामखेड पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती. त्यानुसार भारत गॅस एजन्सी गोडाऊन येथे महेंद्र जितो कंपनीची गाडी क्रमांक MH-16 – CD-28 12 या गाडीचे बॅटरी चोरी गेली आहे. तसेच दुसरे गाडी महेंद्र जितो गाडी क्रमांक MH-16CD 2805 हिची पण बॅटरी चोरी गेली आहे. याप्रकरणी दि 13 सप्टेंबर 2024 रोजी फिर्याद जामखेड पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली होती.
त्यानुसार जामखेड चे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या आदेशाने पोलीस हवालदार प्रवीण इंगळे यांना चौकशीसाठी पाठविले होते. त्याठिकाणी चौकशी केली असता त्यानी सीसीटीव्ही फुटेज चेक केले. त्याठिकाणी त्यांना अज्ञात इसमाला संशयित म्हणून ताब्यात घेतले. तसेच अज्ञात व्यक्ती हा लक्ष्मी चौक येथे त्यांना आढळून आला असता त्यांना चौकशीसाठी पोलीस स्टेशनला घेऊन गेले असता आरोपीला पोलीस खाक्या दाखविताच दोन्ही बॅटऱ्या चोरी केल्याची कबुली अरोपीनी दिली. आरोपीला अटक केल्यानंतर कर्जत कोर्टासमोर हजर केले न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. तसेच अरोपी कडुन दोन बॅटऱ्या जप्त करण्यात आल्या आहे. पुढील तपास पोलीस नाईक सरोदे हे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here