Home ताज्या बातम्या फसवणूक प्रकरणातील तीन महिन्यांपासून फरार आसलेल्या आरोपीस संभाजीनगर येथून अटक

फसवणूक प्रकरणातील तीन महिन्यांपासून फरार आसलेल्या आरोपीस संभाजीनगर येथून अटक

फसवणूक प्रकरणातील तीन महिन्यांपासून फरार आसलेल्या आरोपीस संभाजीनगर येथून अटक
जामखेड प्रतिनिधी
जामखेड येथील मोहीत कदम यांना नोकरीचे आमिष दाखवून पाच लाखाची फसवणूक प्रकरणातील आरोपी तीन महिन्यांपासून फरार होता. जामखेड पोलीसांनी संभाजीनगर येथून विठ्ठल सावंत यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यास कर्जत न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावणी आहे.
आण्णा सावंतच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला पंचवीस जून 2024 रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामखेड कोर्टाने अगोदरच जामीन फेटाळला होता. नुकताच श्रीगोंदा सेशन कोर्टाने देखील जामीन फेटाळला आहे. मात्र आरोपी मोकाट फिरतात मात्र पोलीसांना दिसत नाहीत का? असा सवाल उपस्थित केला जात होता. आरोपींकडून फीर्यादीस जीवीताला धोका असल्याचे निवेदन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना दिले आहे. तसेच जामखेड पोलीसांनी आरोपीला अटक केली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा सौरभ कदम यांनी निवेदनात दिला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. यामुळे जामखेड पोलीसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत संभाजीनगर येथून विठ्ठल सावंत यास अटक केली आहे. अद्यापही आण्णा सावंत फरार आहे. लवकरच त्यालाही अटक करण्यात येईल असे जामखेड पोलीसांनी सांगितले.

आण्णा सावंत विरोधात नोकरीचे आमिष दाखवून पाच लाखाची फसवणूक केली असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आगोदरही जामखेड पोलीस स्टेशनला खंडणीचा गुन्हा दाखल आहे. माझी मंत्रालयात ओळख आहे. मी तुला आरोग्य विभागात कायमस्वरूपी सरकारी नोकरी लावून देतो असे म्हणत संभाजी ब्रिगेडचा प्रदेश उपाध्यक्ष आण्णा सावंत याच्या सह दोघा जणांनी नोकरीचे आमिष दाखवून पाच लाखांची फसवणूक केली. या प्रकरणी आण्णा सावंत सह दोघांवर जामखेड पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. रात्री यातील एक आरोपी विठ्ठल सावंत यास अटक करण्यात आली आहे.

याबाबत फिर्यादी यांनी म्हटले आहे की, आण्णा आदिनाथ सावंत व विट्ठल ज्ञानेश्वर सावंत यांना अटक झालेली नाही सदर आरोपी जामखेड शहरात मोकाट फ़िरत आहेत या आरोपी कडून मला व माझ्या कुटुंबाच्या जीवितास धोका आहे व आरोपी मला वारंवार धमकी देतात तरी जामखेड पोलीसांनी आरोपीला अटक करावी असे निवेदन देण्यात आले होते यानुसार तपासाची चक्रे फिरवत संभाजीनगर येथून विठ्ठल सावंत यास अटक करण्यात आली आहे.
जामखेड पोलीसांनी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल जितेंद्र सरोदे, कुंदन गुळवे, प्रकाश मांडगे यांनी सापळा रचून आरोपी विठ्ठल सावंत यास बेड्या ठोकल्या.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!