जामखेड येथे शिक्षिकेच्या घरी चोरी, घरफोडी करून सव्वा लाखांचा ऐवज लंपास
जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरातील करमाळा रोडवरील एका घरात रात्री घरफोडीत 1 लाख 26 हजार रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे. तसेच घरातील टीव्हीची देखील अज्ञात चोरटय़ांनी मोडतोड केली आहे. याप्रकरणी
अज्ञात चोरट्यांन विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे तीन वर्षांत चार वेळा याच घरात चोरी झालेली आहे. कोणत्याही चोरीचा तपास लागलेला नाही.
आशा किसन उदावंत वय 42 वर्ष धंदा-नोकरी (शिक्षिका) रा. सोनेगाव ता. जामखेड जि. अहमदनगर मुळ रा. करमाळा रोड, गुगळे नर्सरी समोर जामखेड ता. जामखेड जि. अहमदनगर, यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, जामखेड शहरातील करमाळा रोडवरील गुगळे नर्सरी समोर मी व आई वच्छला किसन उदावंत असे एकत्र राहतो मी सोनेगाव ता. जामखेड येथे शिक्षिका म्हणुन नोकरी करत आहे.
माझे पती रमेश शहाणे हे माझे सासरी आशा टॉकीज शेजारी बीड ता. जि. बीड येथे राहतात. माझे गुगळे नर्सरी समोर जामखेड ता. जामखेड जि. अहमदनगर येथिल घर हे बंद असते मी सुट्टीच्या दिवशी जामखेड येथे येत असते. दिनांक – 31 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता मी व माझी आई वच्छला असे आम्ही माझे करमाळा रोड, गुगळे नर्सरी समोर जामखेड ता. जामखेड जि. अहमदनगर येथिल घराला कुलुप लाऊन माझा भाऊ राजेंद्र किसन उदावंत याचे घरी रा. महावीर मंगल कार्यालय समोर जामखेड ता. जामखेड येथे गेलो होतो.
त्यानंतर जेवण करुन तेथेच झोपलो. दुसर्या दिवशी सकाळी दि 1 सप्टेंबर 2024 रोजी मी व माझी आई वच्छला असे आम्ही माझे करमाळा रोड, गुगळे नर्सरी समोर, जामखेड येथिल घरी गेलो असता मला गेट तुटलेले दिसले व घराचा दरवाजाचे कुलुप व कडी कोंडा तुटलेला दिसला.
मी घरात जाउन पाहिले असता घरातील कपाटाचे कुलूप तोडुन कपाटाने नुकसान करुन, कपाटातील सामान अस्तव्यस्त पडलेले दिसले व टी.व्ही. फुटून नुकसान झालेले दिसले. त्यानंतर मी कपाटामध्ये माझे पर्स मध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व पैसे पाहिले असता ते मिळुन आले नाहीत व सोन्याचे दागिने केल्याच्या पावत्या देखील मिळुन आल्या नाही. त्यानंतर मी व माझी आई वच्छला असे आम्ही आजुबाजुला परीसरात शोध घेतला असता दागिने व पैसे मिळुन आले नाही. त्यानंतर आमची खात्री झाली की, माझे 1 लाख 26 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व पैसे काणीतरी चोरुन नेले आहेत आसे दिसुन आले.
या प्रकरणी अज्ञात चोरटय़ांन विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आसुन पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ. प्रविण इंगळे हे करत आहेत. पोलिसांनी काल श्वान पथकाला पाचारण केले होते. फिगंरप्रिट घेऊन गेले आहेत. लवकरात लवकर चोरीचा तपास लावण्यात येईल असे पोलीसांनी सांगितले आहे.