भाजपचे सोशल मीडिया प्रमुख उद्धव हुलगुंडे यांना मारहाण, दोघांनवर गुन्हा दाखल
जामखेड प्रतिनिधी
भाजपचे सोशल मीडिया प्रमुख उद्धव हुलगुंडे यांना दोन जणांनी मारहाण केली आहे. या प्रकरणी दोन जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की तू रोहित (दादा) पवार यांच्या विरुद्ध सातत्याने सोशल मीडियावर पोस्ट का टाकत आहेस. असे म्हणत जामखेड तालुक्यातील पिंपळगाव उंडा येथील सागर गवसने व त्याच्या एका साथीदाराने भाजपा सोशल मीडिया प्रमुख उद्धव हुलगुंडे यांना जामखेड शहरात मारहाण केली आहे. ही घटना दिनांक 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता बीड रोडवरील एका दुकानासमोर घडली आहे. याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चुंबळी येथील उद्धव अश्रू हुलगुंडे यांनी फिर्याद दाखल केली आहे. भाजपा सोशल मीडिया प्रमुख उद्धव हुलगुंडे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दिनांक 29 ऑगस्ट रोजी जामखेड येथे आमदार राम शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयात बसलेलो असताना एका मोबाईल नंबर वरून मला फोन आला व तो मी उचलला यावेळी आरोपींनी सांगितले की मी सागर गवसने बोलतोय परवा जामखेड मध्ये काय धिंगाणा होतोय ते पाहत रहा असे बोलून त्याने फोन कट केला.
31 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हा भाजीमंडई येथून भाजीपाला खरेदी करून पिशवी मोटरसायकलला लावत असतानाच पाठीमागून दुसरा आरोपी दादा राळेभात यांने फीर्यादीस कवळ मारली व त्याचवेळी सागर गवसने हा समोरून आला त्यांनी फिर्यादीच्या शर्टच्या खिशातील बळजबरीने मोबाईल व तीन हजार रुपये काढून घेतले. तीन दिवसांपूर्वी फोन करून तुला सांगितले होते तरीसुद्धा तू रोहित पवार यांच्याविरुद्ध सोशल मीडिया का पोस्ट टाकत आहेस असे म्हणत मारहाण केली.
यानंतर फिर्यादी हा त्याचा मोबाईल घेत असताना झालेल्या झटापटीत सागर गवसने यांनी त्यांना धमकी दिली की परत आगाऊपणा केला तर तुला जिवंत ठेवणार नाही असे म्हणून तो तेथून पळून गेला असेही फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी जामखेड पोलिसात जबरी चोरी व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जामखेड पोलीस आरोपी विरोधात काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान भाजप सोशल मीडिया प्रमुख उद्धव मुंडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा जामखेड तालुक्यातील भाजपकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.