राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात कार्यकर्त्यांना बारामती ॲग्रोच्या कामगारांसारखी वागणूक -प्रा. मधुकर राळेभात
प्रा. मधुकर (आबा) राळेभात यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला रामराम
जामखेड प्रतिनिधी
कर्जत जामखेड मतदार संघात आ. रोहित पवार हे एकाही कार्यकर्त्याला सन्मानाची वागणूक देत नाहीत. त्यांच्या एकाधिकार शाहीला कंटाळून पक्षातील व मित्र पक्षाचे कार्यकर्ते नाराज आहेत. बरेच कार्यकर्ते त्यांच्या पेक्षा वयाने मोठे असूनही सतत त्या कार्यकर्त्यांना अपमानित केले जाते. आ. रोहित पवार हे कार्यकर्त्यांना त्यांच्या बारामती ॲग्रोच्या कामगारान सारखी वागणूक देण्यात, आसा गंभीर आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रा मधुकर आबा राळेभात यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे व आ. रोहित पवार यांचे खंदे समर्थक, कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर (आबा) राळेभात यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला राम राम ठोकला आहे. याबाबत त्यांनी आज रविवार दि 25 ऑगस्ट रोजी पत्रकार परिषदेत घेऊन आपली भुमिका स्पष्ट करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला आसे सांगितले. मात्र कोणत्या पक्षात जाणार हे अद्याप सांगितले नसुन पंधरा दिवसात माझ्या कार्यकर्त्यांन समवेत चर्चा करुन पुढील निर्णय घेण्यात येईल आसे सांगितले. यावेळी नगरसेवक मोहन पवार, अमित जाधव, राष्ट्रवादी खर्डा शहराध्यक्ष महालिंग कोरे व राजेंद्र वारे रत्नापूर हे उपस्थित होते.
याबाबत झालेल्या पत्रकार परिषदेत प्रा .मधुकर आबा राळेभात यांनी पुढे पत्रकारांशी बोलताना सांगितले की आ. रोहित पवार यांनी कर्जत जामखेडचा विकास केला पण कर्जत जामखेड मतदारसंघात आजही अनेक समस्या आहेत. फक्त प्रशासकीय इमारती झाल्या म्हणजे विकास होत नाही. दवाखाने बांधले पण डॉक्टर नाहीत. पंचायत समितीच्या इमारती झाल्या पण इमारतीतील अधिकार्‍यांचा मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत आदरणीय शरद पवार यांचा आदर ठेवून आम्ही व जामखेडच्या जनतेने एका स्थानिक कॅबिनेट मंत्र्यांना हजारो मतांनी पाडले व आमदार रोहित पवार यांना निवडून आणले होते. परंतु गेल्या साडेचार वर्षांमध्ये आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष न ठेवता बारामती ॲग्रो लिमिटेडच्या कामगारांसारखी सर्व कार्यकर्त्यांना वागणूक दिली आहे.
कोणत्याही कार्यकर्त्यांचा सन्मान ठेवला नाही. सतत अपमान कारक वागणूक कार्यकर्त्यांना देण्यात आली. कर्जत जामखेड मतदारसंघात जे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमांच्या बोर्डवर प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष व तालुकाअध्यक्ष या पदाधिकाऱ्यांचे नाव किंवा फोटो न लावता स्वतःच्या आईचे नाव व फोटो लावतात, महाविकास आघाडी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नाव देखील वापरत नाहीत. फक्त आमदार रोहित पवार आयोजित या नावाने कार्यक्रम आयोजित करतात. जामखेड येथील चार दिवसांपूर्वी झालेल्या सायकल वाटप कार्यक्रमात देखील फक्त सतराशे विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आल्या मात्र त्या जास्त प्रमाणात वाटप केल्या असे दाखवण्यात आले.
तालुक्यातील मूलभूत गरजांचा विकास न करता शासकीय इमारती बांधून मोठा विकास केल्याचा बोलबाला केला जात आहे. मतदारसंघाचा मात्र विकासाच झाला नाही अधिकाऱ्यांची मनधरणी केली जाते, आजही तालुक्यांमध्ये वीज, पाणी, रस्ते हे ज्वलंत प्रश्न असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून अधिकाऱ्यांना बसण्या उठण्यासाठी करोडो रुपये खर्च केला आहे. मात्र त्याने रोजगाराचा मूलभूत गरजांचा प्रश्न सुटला नाही. मतदार संघातील एकाही कार्यकर्त्याला सन्मानाची वागणूक न देता बारामती ॲग्रोवनच्या कामगारासारखी वागणूक देण्यात आली.
कर्जत जामखेड मतदार संघात गेल्या पंचवीस तीस वर्षांपासून ज्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र पक्षासाठी काम केले त्यांनाही सन्मानाची वागणूक दिली जात नाही. बरेच कार्यकर्ते त्यांच्या पेक्षा वयाने मोठे असूनही सतत त्या कार्यकर्त्यांना अपमानित केले जाते. बऱ्याच कार्यकर्त्यांना दम देऊन भयभीत केले जाते किंवा विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातो हे कुठले राजकारण आहे.
राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यक्रमात ज्येष्ठ कार्यकर्त्यांना मत मांडण्याचा अधिकार दिला जात नाही. मतदार संघात एखादा कार्यक्रम किंवा उद्घाटन उद्घाटनासाठी आमदार उपस्थित नसेल तर स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तीच्या हस्ते कार्यक्रम केला जातो पण कार्यकर्त्यांना संधी दिली जात नाही. या सर्व गोष्टींना कंटाळून मी आज रविवार दि 25 ऑगस्ट रोजी पासुन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पक्षाला सोडचिट्टी दिली आहे आसे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रा मधुकर (आबा) राळेभात यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here