व्हाटसअप स्टेटस ठेऊन ; बेपत्ता झालेल्या शिक्षकाची सौताडा धबधबा येथे आत्महत्या
जामखेड प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षा अभियान अंतर्गत पाटोदा येथील पंचायत समितीमध्ये समावेशित शिक्षण विभागाचे साधन व्यक्ती म्हणून कार्यरत असलेले शिक्षक गजेंद्र गुंडाले-रेड्डी हे दोन दिवसापासून बेपत्ता होते. गुंडाले यांची दुचाकी गाडी ही पाटोदा तालुक्यातील सौताडा धबधब्याजवळ आढळून आली.
गुरुवारी दिवसभर कर्मचारी आणि त्यांच्या मित्रांनी सौताडा परिसरातील धबधब्याजवळ आणि खाली उतरून सर्वत्र शोधाशोध केली परंतु गुंडाले हे आढळून आलेले नव्हते. शुक्रवार दिनांक 23 रोजी सकाळी श्रीराम मंदिराच्या समोर डोहामध्ये सदरील कर्मचाऱ्यांचा मृतदेह सापडला असून त्यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान गुंडाले यांनी दोन दिवसांपूर्वी मोबाईलवर संदेश पाठवला होता की मी आज पर्मनंट झालो आहे. परंतू मला माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्य आई बायको यांची साथ नाही….
मुख्यमंत्री यांनी समग्र शिक्षा मधील कंत्राटी कर्मचारी विशेष शिक्षक यांना कायम करण्याचा निर्णय घेतला…
त्याच्या वर महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद चर्णी रोड मुंबई यांनी काम सुरु केले. ईकडे या लोकांन कडुन पैसे उकळण्या साठी यांच्या संघटना पुढे सरसावल्या…4 वर्षा पुर्वी कायम करतो म्हणून संघटनेच्या काही लोकांनी हवाला मार्फत प्रत्येकी 90 हजार रुपये गोळा केले. 3100 लोक गुणिले 90 हजार या प्रमाणे पैसे गोळा केले.
त्या नंतर नुकतेच मुख्यमंत्री यांनी घोषणा केली असता पुन्हा संघटना जागृत झाल्या आणि राज्यभरातील 3100 लोकांकडून पुन्हा प्रत्येकी 20 हजार रुपये जमा करायला सुरवात केली. बीड येथे देखील त्याची मिटींग झाली. आणि त्या मिटींगमध्ये सांगण्यात आले की जो कोणी विशेष शिक्षक 20 हजार रुपये देणार नाही त्याचे काम आम्ही होऊ देणार नाही. हे सर्व पाहुन 20 हजार पगार असलेल्या गुंडालेनी आई व बायकोला मिटींग संपल्यानंतर संपर्क केला…आईचा व बायकोचा सपोर्ट नाही हे पाहून त्यानी स्टेट्स ठेऊन थेट सौताडा गाठला व आपली जीवन यात्रा संपवली.
याचा शोध व्हावा व एका गरीब बेबस कंत्राटी कर्मचार्‍यास व त्याच्या कुटुंबातील छोट्या छोट्या लेकरांना न्याय मिळावा. अशी मागणी होत असून पुढील तपास पाटोदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक केदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी उबाळे हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here