Home क्राईम न्यूज जमिनीच्या वादावरून पाटोदा (गरड) येथे एकास लोखंडी रॉड व काठ्यांनी मारहाण, चार...
जमिनीच्या वादावरून पाटोदा (गरड) येथे एकास लोखंडी रॉड व काठ्यांनी मारहाण, चार जणांविरोधात गुन्हा दाखल.
जामखेड प्रतिनिधी
जमीनीच्या मालकी हक्काच्या वादाच्या कारणावरून फिर्यादीस चार जणांनी लोखंडी रॉड, लाकडी काठ्या, दगड व विटाने मारहाण करून फिर्यादीस गंभीर जखमी केले या प्रकरणी चार जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चारही आरोपी फरार आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील पाटोदा (गरड) येथे फिर्यादी आप्पासाहेब लक्ष्मण गव्हाणे, वय ४० धंदा शेती व ड्रायव्हर यांची पाटोदा गावच्या शिवारात शेतजमीन गट नंबर ३२५ मध्ये सहा गंठे जमीन असून त्यामालकी हक्कावरून फिर्यादी व आरोपी यांच्यातील वाद जामखेड न्यायालयात सुरू आहे. यातील आरोपी गफार मुद्देखान पठाण यांने पंधरा दिवसांपुर्वी आमच्या जागेवर अतिक्रमण करत वॉशिंग सेंटर चा रॅम्प बांधकाम केले आहे.
दि. १६ रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आरोपींनी अतिक्रमण केलेल्या जागेतील वॉशिंग सेंटर रॅम्प समोर कर्जत जामखेड रस्त्यावर स्काँर्पिओ गाडी लावली होती. व फीर्यादी व नवनाथ आण्णा गव्हाणे हे बस स्थानक येथील एका हाॅटेलवर चहा पिण्यासाठी दोघेजण गेले असता यावेळी आरोपी गफार मुद्देखान पठाण, खुर्शीद तय्यब पठाण, मयूर तय्यब पठाण, तैशिफ रज्जाक मुलानी (शेख) हे सर्व रा. पाटोदा (गरड) यांनी ट्रक्टरच्या सहाय्याने गाडी बांधून ओढण्यास सुरूवात केली. याबाबत मी त्यांना विचारणा केली असता आरोपी एक व दोन यांनी फिर्यादीस लोखंडी राँडने
व आरोपी तीन व चारने लाकडी काठ्याने मारहाण केली आहे.
यावेळी फिर्यादी आरोपींना घाबरून स्काँर्पिओ गाडीकडे जात असताना आरोपींनी दगड व विटांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी आप्पासाहेब लक्ष्मण गव्हाणे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून वरील चार जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार शिवाजी कदम करत आहेत.
error: Content is protected !!