जामखेड तालुका डॉक्टर्स असोशिएशन कडुन कलकत्ता महीला डॉक्टरच्या हत्येचा निषेध.
जामखेड प्रतिनिधी
कलकत्ता येथील झालेल्या डॉक्टर महिलेवरील अत्याचार व खून प्रकरणाच्या निषेधार्थ आज शनिवार दि 17 रोजी जामखेड तालुका डॉक्टर असोसिएशन जामखेड कडून निषेध व्यक्त केला आहे. तसेच यावेळी तहसीलदार यांना निवेदन देऊन संबंधित आरोपी कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
कोलकाता येथील आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयातील लेडी डॉक्टरवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणाचे पडसाद देशातील अनेक राज्यात उमटताना दिसतायेत. याच अनुषंगाने जामखेड तालुक्यातील डॉक्टरांनी देखील या घटनेचा निषेध केला. तसेच जामखेड तालुका डॉक्टर्स असोशिएशन कडुन तहसीलदार गणेश माळी व पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना आज शनिवार दि 17 रोजी सकाळी निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कलकत्ता येथे एका महिला डॉक्टरवर हॉस्पिटल मध्येच अत्याचार करून तिची अमानुषपणे हत्या करण्यात आली आहे. या झालेल्या घटनेचा आम्ही जामखेड तालुका डॉक्टर असोशियन चे पदाधिकारी व सर्व सभासद निषेध व्यक्त करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी. तसेच आरोपीला कडक शिक्षा होण्यासाठी प्रशासनाने योग्य ते काम करून या घटनेची चौकशी करावी.
यावेळी जामखेड तालुका डॉक्टर्स असोशिएशन चे सचिव डॉ. सादेख पठाण, डॉक्टर भरत देवकर, डॉक्टर फारूक आजम, डॉक्टर चंद्रकिरण भोसले, डॉक्टर अक्षय अडाले, डॉक्टर विकी दळवी, डॉक्टर निखिल वारे, डॉक्टर विद्या तोंडे, डॉक्टर ज्योती दळवी, सह तालुक्यातील अनेक डॉक्टर निवेदन देता वेळी उपस्थित होते.