बाळगव्हाण येथील पुजारी कुशाबा शिकारे खुन प्रकरणी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील बाळगव्हाण येथील शिकारे वस्ती वरील आरोपी शंकर सोपान शिकारे वय ३२ वर्ष यांने पुजारी कुशाबा शिकारे यांना जीवे ठार मारल्या प्रकरणी श्रीगोंदा न्यायालयाचे जिल्हा व सत्रन्यायाधीश एम. एस. शेख यांनी भादवी कलम ३०२ अन्वये आरोपी यास दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच रक्कम रुपये पाच हजार दंड व दंड न भरल्यास सहा महिने साधी कैदेची शिक्षा सुनावली आहे. सदर खटल्याचे कामकाज अतिरिक्त सरकारी वकील पुष्पा कापसे (गायके) यांनी पाहिले,
घटनेची माहिती अशी की, जामखेड तालुक्यातील बाळगव्हान शिकारे वस्ती येथील दत्त मंदिरातील पुजारी कुशाबा तुळशीराम शिकारे यास धार्मिक क्षेत्राची आवड होती. शिकारे वस्ती येथे आपल्या घरा जवळच बांधण्यात आलेल्या दत्त मंदिरात ते पुजारी म्हणून देखील काम पहात होते. त्यांना गायन, भजन व कीर्तनाची आवड देखील होती. अतिशय मनमिळावू व शांत स्वभावाचे आसनारे कुशाबा शिकारे यांना सर्व महाराज म्हणत आसे. त्यांच्याकडे पुणे, मुंबई व इतर ठिकाणाहून दर्शनासाठी व अडी अडचणी कामे सोडविण्याचे साठी लोक येत होते.
शनिवार दि २ मार्च २०१९ रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास कुशाबा शिकारे महाराज हे दत्त मंदिरात भजन आसल्याने तयारी करण्यासाठी मंदिरातील माईक व साऊंड सिस्टीम लावण्यासाठी गेले होते. मंदिरात प्रवेश करताच यावेळी गावातीलच भावकीतील शेजारी रहाणारा आरोपी शंकर सोपान शिकारे याने महाराज कुशाबा शिकारे याच्या तोंडावर व गळ्यावर धारधार चाकूने वार केले व मंदिराच्या पाठीमागे अंधाराचा फायदा घेऊन पळुन गेला होता.
यानंतर मयताची पत्नी व मुलगा यांना मंदिराच्या दिशेने मोठ्याने ओरडल्याचा आवाज ऐकू आल्याने ते मंदिराच्या दिशेने धावले त्यावेळी आरोपी शंकर शिकारे हा हातामध्ये चाकू घेऊन मंदिराच्या डाव्या बाजूने पळताना दिसला. त्यावेळी मयत कुशाबा शिकारे रक्ताच्या थारोळ्यात पड़लेले पाहिले असता त्यांच्या चेहऱ्यावर, मानेवर, हातावर जखमा दिसून आल्या. त्यानंतर मयताच्या मुलाने मयतास उपचारा करण्यासाठी खर्डा येथे दवाखान्यात घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्यांना मयत झाल्याचे घोषित केले, त्यानंतर मयताची पत्नी यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली,
फिर्यादी वरून आरोपी विरुद्ध भादवी कलम ३०२ प्रमाणे गुन्हा नोंदविला होता. पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी संपूर्ण तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र पाठवले तपासा दरम्यान असे निष्पन्न झाले की, आरोपीच्या आजोबांनी आत्महत्या केली होती यातील मयत कुशाबा शिकारे हा त्यांचे आत्महत्येस कारणीभूत असल्याचे संशयावरून आरोपी याने कुशाबा शिकारे यांचा खुन केला. सदर खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश मुजीब एस. शेख यांच्या न्यायालयात झाली.