रोमहर्षक चाललेल्या कुस्तीत शेवटी पॉइंट वरती माऊली कोकाटे यांनी पटकावली मानाची गदा.
नेत्रदीपक लढतींनी गाजला कै. विष्णू उस्ताद आखाडा.
जामखेड प्रतिनिधी
कै. विष्णू उस्ताद काशीद आखड्याने नागपंचमीची ओळख बदलून मल्लांना कुस्तीच एक चांगलं मैदान उपलब्ध करून दिलं असे मत आमदार प्राध्यापक राम शिंदे यांनी व्यक्त केले. त्यांच्या शुभ हस्ते मानाची पहिली कुस्ती लावली गेली यावेळी ते बोलत होते. मी सगळी कामे बाजूला ठेऊन मल्लांना प्रोसहीत करण्यासाठी आवर्जून दरवर्षी याठिकाणी उपस्थित राहतो असेही त्यांनी यावेळी आपल्या भाषणात सांगितले.
नागपंचमी यात्रेनिमित्त सालाबाद प्रमाणे यावर्षी ही अजय (दादा) काशीद मित्र परिवाराच्या वतीनं कै. विष्णू उस्ताद काशीद यांच्या स्मरणार्थ भव्य निकाली कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आले होते. पहिली मानाची कुस्ती महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील आणि उपमहाराष्ट्र केसरी माऊली कोकाटे यांच्यात अतिशय रोमहर्षक झाली सुमारे 35 मिनिटे चाललेल्या या कुस्तीत शेवटी पॉइंट वरती माऊली कोकाटे यांनी मानाची गदा पटकावली या लढतीने संपूर्ण कुस्ती शौकिनांचा श्वास रोखून धरला होता.
या मैदानासाठी महाराष्ट्रासह पर राज्यातून मल्लांनी हजेरी लावली होती प्रमुख अतिथी मदेअश्वलिंग संस्थान पिंपळवाडी ह.भ.प. महादेवा नंद भारती महाराज, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे, माजी मंत्री रविकांत तुपकर, माजी सभापती भगवान मुरूमकर, मार्केट कमिटी सभापती शरद कार्ले, मधुकर राळेभात, पवन राळेभात, मराठा गौरव युवराज (भाऊ) काशीद, स्वातीताई काशीद, संध्या सोनवणे, सारोळा गावच्या सरपंच रीतुताई काशीद, श्याम भैय्या धस, अमित चिंतामणी, सूर्यकांत मोरे, आदी मान्यवर उपस्थित होते.
दरवर्षी प्रमाणे या वर्षीही रात्री उशिरा पर्यंत आखाडा चालू होता. शेवटची कुस्ती संपेपर्यंत मैदान खचा खच भरलेले होते. या आखाड्याचे वैशिष्ट्य म्हणजे महिला कुस्त्याही यामध्ये लागल्या गेल्या तसेच अनेक महिला भगिनी कुस्त्या पाहण्यासाठी मैदानात आवर्जून उपस्थित असल्याचे पहावयास मिळाले. आखड्याच्या च्या निमित्ताने मल्लखांब प्रात्यक्षिक ही दाखवण्यात आली त्यानेही प्रेक्षकांची मने जिंकली.
जामखेड सारख्या ग्रामीण भागात अजय (दादा) काशीद यांनी मैदान उपलब्ध करून दिल्याने सर्व कुस्ती पट्ट आणि कुस्ती शौकीन यांच्या वतीने अजय काशीद यांचे आभार मानण्यात आले आणि असेच मैदान दरवर्षी उपलब्ध करून द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली. कै. विष्णू उस्ताद काशीद प्रतिष्ठान च्य्या माध्यमातून या आखाडा सोबतच अनेक सामाजिक उपक्रम वेळोवेळी राबवले जातात त्यामुळे सर्व स्तरातून कौतुक होताना पहावयास मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here