Home क्राईम न्यूज तीन महिन्यापूर्वीच झालं लग्न; नवदाम्पत्यानं झाडाला गळफास घेऊन संपवलं जीवन, अहमदनगर जिल्ह्यातील...

तीन महिन्यापूर्वीच झालं लग्न; नवदाम्पत्यानं झाडाला गळफास घेऊन संपवलं जीवन, अहमदनगर जिल्ह्यातील घटना

तीन महिन्यापूर्वीच झालं लग्न; नवदाम्पत्यानं झाडाला गळफास घेऊन संपवलं जीवन, अहमदनगर जिल्ह्यातील घटना
अहमदनगर प्रतिनिधी
तीन महिन्यापूर्वीच विवाह झालेल्या नवदाम्पत्यानं आत्महत्या केल्यानं मोठी खळबळळ उडाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील साकूर परिसरात असलेल्या महालदरा इथं ही घटना उघडकीस आली. पुण्यात नोकरी करणारं हे दाम्पत्य दोन दिवसांपूर्वीचं गावी परतलं होतं. मात्र त्यानंतर त्यांनी टोकाचं पाऊल उचललं. रविवारी (ता. ११) रोजी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली.
तीन महिन्यापूर्वी लग्न झालेल्या नवदाम्पत्यानं एकाच झाडाला गळफास घेऊन आपलं जीवन संपवल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना संगमनेर तालुक्यातील साकूर जवळील महालदरा इथं घडली असून वैभव आमले आणि स्नेहा आमले अशी या नवदाम्पत्याची नावं आहेत. वैभव आमले हे पुण्याजवळील चाकण इथं नोकरी करत असून दोन दिवसांपूर्वी ते आपल्या गावी आले होते. मात्र गावी परतल्यानंतर त्यांनी आपल्या पत्नीसह गळफास घेत आत्महत्या केल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
वैभव आमले आणि स्नेहा आमले हे मल्हादरा इथलं दाम्पत्य चाकण इथं राहत होते. मागील दोन दिवसांपूर्वी हे दाम्पत्य आपल्या गावी परतलं होतं. मात्र साकूरजवळील महालदरा इथं रविवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास या नवदाम्पत्यानं एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब उघडकीस आल्यानंतर नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी या नवदाम्पत्यानं एकाच फांदीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं उघडकीस आलं. मात्र त्यांनी आत्महत्या का केली, याचं कारण अद्यापही समोर आलं नाही.
नवदाम्पत्यानं आत्महत्या केल्यानं परिसरात हळहळ
नवदाम्पत्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरली. यानंतर शेकडो नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. घटनेची माहिती घारगाव पोलिसांना कळताच तातडीनं घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव, प्रमोद गाडेकर, सुभाष बोडखे आदी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. त्यानंतर नव दाम्पत्यांचा मृतदेह संगमनेर येथील कुटीर रूग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला आहे. या नवदाम्पत्यानं आत्महत्या केल्यानं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
तीन महिन्यापूर्वीच झाला होता विवाह
वैभव आमले आणि स्नेहा आमले या दोघांचा तीन महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. वैभव आमले हे पुण्यातील चाकण इथं नोकरीस होते. दोन दिवसांपूर्वी नुकतंच दोघंही आपल्या गावी साकूरला आले. मात्र अचानक दोघांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेऊन जीवन संपवलं. मात्र या दोघांनी आत्महत्या का केली ? याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!