श्री नागेश विद्यालयचा वेदांत अभिजीत निंबाळकर रयत प्रज्ञा शोध परीक्षेत संस्थेत राज्यात नववा
जामखेड प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेचे श्री नागेश विद्यालय मधील वेदांत अभिजीत निंबाळकर याने आरटीएस रयत प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये उत्तर विभाग अहमदनगर मधून दुसरा तर संस्थेमध्ये नववा क्रमांक मिळवला. याबद्दल नागेश विद्यालयाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.
या विद्यार्थ्यांने रयत प्रज्ञाशोध परीक्षेत 200 पैकी 170 गुण मिळवले असून रयत शिक्षण संस्थेच्या मार्फत ही या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला आहे. तसेच मार्गदर्शक शिक्षक RTS विभाग प्रमुख अशोक सांगळे, कृष्णा मुरकुटे, संतोष पवार, एस आर रणदिवे, एस डी लोखंडे, गोपाल बाबर, गुरुकुल प्रमुख संतोष ससाने यांचा विद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रमुख उपस्थिती प्राचार्य मडके बी के ,पर्यवेक्षक कोकाटे व्ही के, गुरुकुल प्रमुख संतोष ससाने, रघुनाथ मोहोळकर, बी एस साळुंखे ,एनसीसी ऑफिसर मयूर भोसले, सोमीनाथ गर्जे , म्हस्के एम बी, जे बी गोपालघरे आदी मान्यवर उपस्थित होते. आमदार रोहित (दादा) पवार, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य हरिभाऊ बेलेकर ,रा काँ महाराष्ट्र सरचिटणीस राजेंद्रजी कोठारी, विनायक राऊत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अशोक यादव, उपाध्यक्ष अमोल बहिर यांनी या यशाबद्दल अभिनंदन केले.