चिखलातून वाट काढत विद्यार्थी गाठतात शाळा, मेंगडे वस्ती, डिसलेवस्ती रस्त्याची झाली दुरावस्था.
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील डिसलेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेपासून ते डिसले वस्ती या रस्त्यांची अतिशय दुरावस्था झाली असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाताना चिखल तुडवत शाळेत जावे लागते. ग्रामस्थांनी अनेक वर्ष मागणी करून देखील हा रस्ता होत नसल्याने डिसलेवाडी येथील ग्रामस्थ आता आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. जर हा रस्ता झाला नाही तर जामखेड पंचायत समितीच्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा डिसलेवाडी, मेंगडे वस्ती व डिसलेवस्ती येथील ग्रामस्थांनी बोलताना दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की जामखेड तालुक्यातील डीसलेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ते मेंगडे वस्ती व डीसलेवस्ती या रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली आहे. सध्या पावसाचे दिवस असल्याने व याठिकाणी पक्का रस्ता नसल्याने ग्रामस्थांचे व विद्यार्थांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. शाळेत जाताना विद्यार्थींना चाखल तुडवत शाळेत जावे लागते. या रस्त्यावर जाता येता आनेक वेळा पायी चालणारे व दुचाकीस्वार देखील घसरून पडले आहेत. तसेच ग्रामस्थांना आपले नातेवाईक आजारी पडले तर देखील या ठिकाणाहून दवाखान्यात घेऊन जाताना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. या चिखलमय रस्त्यामुळे ग्रामस्थांना आनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
त्यामुळे या चिखलमय रस्त्यावर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नीधी उपलब्ध करुन तातडीने मुरुमीकरण व खडीकरण करून सदरचा रस्ता सिमेंट काँक्रीटचा करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सदरचा रस्ता तातडीने केला नाहीतर डिसलेवाडी येथील महादेव मेंगडे, ईश्वर डिसले, गणेश डिसले, माऊली डिसले, गोवर्धन मेंगडे, अण्णा मेंगडे, रवी शास्त्री वाकडे, गजानन डिसले, शेखर डिसले, वैभव डिसले, भीमराव डिसले, श्रीधर आयकर, प्रवीण डिसले, बापूराव जगताप, दादा मेंगडे, विश्वनाथ नेटके, मेघराज डिसले, सुमंत डिसले या ग्रामस्थांनी पंचायत समिती समोर आंदोलन करण्याचा इशारा बोलताना दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here