मराठा समाज विरूद्ध ओबीसी अशी राजकीय लढाई आहे – ॲड. प्रकाश आंबेडकर
जामखेड येथे ओबीसी आरक्षण बचाव यात्रेचे जंगी स्वागत
जामखेड प्रतिनिधी
मराठा समाज विरूद्ध ओबीसी अशी राजकीय लढाई आहे. राजकीय लढाई राहिली तर ज्यांना मत देयची आहे.ते देतील मराठा समाज ओबीसी ला मतदान करणार नाही व ओबीसी मराठा समाजाला मतदान देणार नाही. मराठा विरूद्ध ओबीसी आसे हे राजकीय भांडण आहे आसे मत डॉ प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.
पुढे बोलताना आंबेडकर म्हणाले की महाराष्ट्राचा मणिपूर होईल का? महाराष्ट्राचा मणिपूर करण्याचा डाव आहे. आपले भांडण लावण्याचे काम करत आहेत. गावातले वातावरण बिघडणार नाही.याची दक्षता आपण घेतली पाहिजे.हिंदू – मुस्लिम वाद निर्माण करण्याची चाल नाकारता येत नाही. मुस्लिम बांधवांनी अजून दोन महिने सहन करा.” दो महिने के बाद स्टेट के चूनाव है,जिसको जगह बताना है,उसे जगह बतादो! ओबीसी आरक्षणाची लढाई व ओबीसी राजकीय चेहऱ्याची सुरवात करूया .
या रॅलीची सांगता ७ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे होणार आहे.याच दिवशी माजी पंतप्रधान व्हि.पी. सिंह यांनी ओबीसी मंडल लागू केले होते.हा दिवस प्रत्येक वर्षी साजरा केला पाहिजे.लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी ॲड.प्रकाशआंबेडकर यांनी केले.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक २५ जुलै पासून मुंबई दादर येथील चैत्यभूमीवर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून निघालेली एससी,एसटी,ओबीसी आरक्षण बचाव यात्रा आज रोजी चौंडी येथे जात असून रात्री ९ वाजता जामखेड शहरातील खर्डा चौक येथे भारतीय बौद्ध महासभा, मुस्लिम पंच कमिटी जामखेड, ग्रामस्थ तसेच वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.रॅली चौंडीकडे रवाना झाली.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते ॲड.डॉ. अरुण जाधव, प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण, बापूसाहेब ओव्हळ,तालुका अध्यक्ष अतिश पारवे, मुस्लिम पंच कमिटीचे अध्यक्ष अझहरभाई काझी, मुक्तार सय्यद, नय्युमभाई सुभेदार, भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य अशोक आव्हाड, बापूसाहेब गायकवाड, सुरेखा सदाफुले, सुरेखा रत्नाकर सदाफुले, अरुणा सदाफुले, सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले, लहुशेठ पवार, योगेश सदाफुले,मंगेश घोडेस्वार,सचिन भिंगारदिवे, अजिनाथ शिंदे, विशाल पवार, वैजिनाथ केसकर, संतोष चव्हाण, राजू शिंदे, रेश्मा बागवान, भिमराव चव्हाण, मुकूंद घायतडक, ऋषिकेश गायकवाड, विकास गोपाळघरे, अशोक गंगावणे, बाजीराव गंगावणे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.