कैतुकास्पद! नायब तहसीलदार मनोज भोसेकर यांच्या मुलाचा जिल्हा परिषद शाळेत प्रवेश.
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील वाढलेली शैक्षणिक गुणवत्ता पाहून नायब तहसीलदार मनोज भोसेकर यांनी त्यांच्या मुलगा चि. अद्ध्येय याचा इयत्ता १ ली मध्ये जिल्हा परिषद शाळा जामखेड (मराठी मुले) या शाळेत प्रवेश घेतला.
सरकारी मालकीच्या जिल्हा परिषद शाळांनी खासगी शाळांना लाजविणारी कामगिरी केली आहे. शैक्षणिक उपक्रम असो की गुणवत्ता, विविध प्रकारच्या परीक्षा असोत की क्रीडा स्पर्धा प्रत्येक ठिकाणी जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांनी लौकिक जपला आहे. मात्र हल्ली, काही जणांनी इंग्रजी शाळा म्हणजे उत्कृष्ट असा एक समज करुन घेतला आहे. काही जण प्रतिष्ठेसाठी मुलांचा प्रवेश महागडया शाळेत करतात. मात्र जामखेड महसूल विभागातील नायब तहसीलदार मनोज भोसेकर यांनी आपल्या मुलाचा इयत्ता पहिली मध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतला आहे.
यावेळी अद्ध्येय या विद्यार्थ्याचे तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री बाळासाहेब धनवे यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. तसेच जिल्हा परिषद शाळा (मराठी मुली) च्या शिक्षिका सोनाली जोरे यांनीही त्यांचा मुलगा श्लोक ब्रह्मदेव हजारे याला इयत्ता १ ली मध्ये दाखल केले.
यावेळी बाळासाहेब धनवे यांनी नायब तहसीलदार मनोज भोसेकर व जिल्हा परिषद शाळा (मराठी मुली) च्या शिक्षिका सोनाली जोरे या पालकांचा इतर अधिकारी, कर्मचारी यांनी आदर्श घेऊन आपल्या पाल्यांना जिल्हा परिषद शाळेत दाखल करण्याचे आवाहन केले आहे.
यावेळी नायब तहसीलदार श्री भोसेकर व त्यांच्या पत्नी यांचा शाळेतील सर्व शिक्षक/शिक्षिका यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी शाळा व्यस्थापन समितीचे अध्यक्ष नसीर चाचू, मुख्याध्य्पक कर्डिले सर, यादव सर, सर्व शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.