श्री नागेश संकुलात 2650 विद्यार्थ्यांनी केला सामूहिक योग, जागतिक योग दिन उत्साहात संपन्न
जामखेड प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश संकुलामध्ये नागेश विद्यालय, कन्या विद्यालय व सतरा महाराष्ट्र बटालियन एनसीसी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिन उत्साहात संपन्न झाला.
यावेळी नागेश विद्यालय कन्या विद्यालय विद्यार्थी विद्यार्थिनी व एनसीसी कॅडेट यांनी उत्साहामध्ये योग प्रात्यक्षिकात सहभाग घेतला. योग गुरु संतोष सरसमकर व यांनी विविध आसनांचे प्रात्यक्षिक सादर करून विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिक करून घेतले व सकस आहार विषयी मार्गदर्शन केले. यावेळी योगासने, शीर्षासन, चक्रासन, त्रिकोणासन, हलासन, सर्वांगासन पश्चिमोटानासन, वक्रासन, वज्रासन, प्राणायाम तसेच विविध व्यायाम, सूर्यनमस्कार प्रात्यक्षिक करून घेतली. योग शिक्षिका कीर्ती कडलक योगा संदर्भात मार्गदर्शन केले.

यावेळी प्रमुख उपस्थिती प्राचार्य मडके बी के, मुख्याध्यापिका चौधरी के डी, पर्यवेक्षक कोकाटे व्ही के, पर्यवेक्षक संजय हजारे गुरुकुल प्रमुख संतोष ससाने, एनसीसी ऑफिसर मयूर भोसले, रघुनाथ मोहोळकर, साळुंखे, सुग्रीव ठाकरे, मनोज पोकळे, शंभूदेव बडे, योग शिक्षिका कीर्ती कडलक, नागेश कन्या विद्यालयातील सर्व शिक्षक पालक विद्यार्थी एनसीसी कॅडेट मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राचार्य मडके बी के यांनी योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांनी दररोज व्यायाम करावा असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ऑफिसर मयूर भोसले तर आभार कोकाटे व्ही के सर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here