महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या अ. नगर जिल्हा निरीक्षक म्हणून फायक अली सय्यद यांची तर जामखेड तालुका अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रेय राऊत यांची निवड
जामखेड प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई. या संघटनेच्या अ. नगर जिल्हा निरीक्षक म्हणून जेष्ठ पत्रकार फायक अली सय्यद यांची निवड करण्यात आली आहे. तर जामखेड तालुका अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रेय राऊत यांची निवड करण्यात आली. या वेळी दोघांना निवडीचे पत्र विश्वासराव आरोटे साहेब यांच्या हस्ते देण्यात आले.
नुकतीच शिर्डी येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई. या संघटनेची मिटींग आयोजित करण्यात आली होती. या मीटिंगमध्ये सर्वानुमते जिल्हा अध्यक्ष, जिल्हा निरीक्षक, तालुका अध्यक्ष यांच्या निवडी करण्यात आल्या. दोघांच्या निवडीबद्दल पत्रकारीता क्षेत्रात योग्य व्यक्तीची योग्य ठिकाणी निवड करण्यात आली आहे. आशी बोलकी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. सदर पत्रकार हे निष्ठेने या क्षेत्रात गेली तिस वर्षे काम करत आहेत. व्यवसायीक दृष्टीकोन न ठेवता एक विचार समोर ठेऊन काम करत आहेत. त्यांच्या निवड झाल्याचे शहरात कळताच काही पत्रकारांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.
जामखेड शहरात व तालुक्यात त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. शिर्डी येथे आयोजित सभेच्या अध्यक्षस्थानी राज्य पत्रकार संघ मुंबई. चे राज्य सरचिटणीस मा. विश्वासराव आरोटे हे उपस्थित होते. तर राज्य निरीक्षक म्हणून भाऊसाहेब वाकचौरे पाटील हे उपस्थित होते. सदर मिटींग अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here