{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"adjust":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या डॉक्टर्स सेलच्या अहमदनगर जिल्हा उपाध्यक्षपदी डॉ चंद्रशेखर नरसाळे यांची निवड
जामखेड प्रतिनिधी
जामखेड येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे डॉक्टर चंद्रशेखर नरसाळे सर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार डॉक्टर सेल च्या अहमदनगर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वर्धापन दिनाच्या दिवशी खासदार अमोल कोल्हे व निलेश लंके यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.
डॉ .सुनिल जगताप सर(प्रदेशाध्यक्ष कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार व जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या सुचने नुसार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या डॉक्टर्स सेल बळकट करण्यासाठी व पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्यांन पर्यंत पोहचवण्यासाठी डॉ .चंद्रशेखर नरसाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदरच्या निवडीचे पत्र खासदार डॉ अमोल कोल्हे व खासदार निलेश लंके तसेच प्रदेश अध्यक्ष डॉ सुनिल जगताप सर जिल्हा अध्यक्ष डॉ. बाबासाहेब कावरे यांच्या हस्ते पक्षाच्या वर्धापन दिनादिवशी देण्यात आले.
निवडी बद्दल डॉक्टर चंद्रशेखर नरसाळे यांचा जामखेड येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरातील आ.रोहित पवार यांच्या कार्यालयात सत्कार करण्यात आला. या दरम्यान आ.रोहित (दादा) पवार जिल्हा उपाध्यक्ष दत्ताभाऊ वारे, जिल्हा परिषद सदस्य शहाजी (काका) राळेभात, दत्तात्रय सोले पाटील, हरीभाऊ आजबे, वसीम सय्यद, ओबीसी सेल प्रदेश प्रवक्ते डॉ. कैलास हजारे, प्रशांत (काका) राळेभात, महेश राळेभात, गणेश घायतडक, अनिल जावळे, प्रा. कुंडल राळेभात, गणेश हगवणे, सुर्यकांत सदाफुले, अनिल कोल्हे व रवी अष्टेकर यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here