पत्रकार अविनाश कदम यांना महाराष्ट्र स्वाभिमान गौरव राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर
आष्टी। प्रतिनिधी
आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा दै. लोकमत, मराठवाडा साथी वृत्तपत्रांचे तालुका प्रतिनिधी अविनाश कदम हे मागील गेल्या १५ वर्ष पत्रकारिता क्षेत्रांमध्ये कार्यरत असून अनेक सामाजिक व गोरगरीब सर्वसामान्यांच्या, विविध घटकांतील प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम व न्याय मिळवून देण्याचे काम पत्रकारितेच्या माध्यमातून करत असून त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल मुंबई येथील जय महाराष्ट्र पत्रकार वृत्तपत्र लेखक व कवी महासंघाच्या वतीने आयोजित शिवराज्याभिषेकाच्या गौरवशाली दिनानिमित्त महाराष्ट्र स्वाभिमान गौरव राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती अध्यक्ष प्रकाश जाधव व सचिव सुरज भोईर यांनी दिली.
मुंबई येथील जय महाराष्ट्र पत्रकार वृत्तपत्र लेखक व कवी महासंघाच्या वतीने शिवराज्याभिषेकाच्या गौरवशाली दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देण्यात येत असतात. या वर्षीचा २०२४ चा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार अविनाश कदम यांना जाहिर झाला असून लवकरच दि.२३ जून २०२४ रोजी मुंबई पत्रकार संघ येथील पत्रकार भवन आझाद मैदानाजवळ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तर अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार असून त्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. मुंबई येथील जय महाराष्ट्र पत्रकार वृत्तपत्र लेखक व कवी महासंघाच्या वतीने धार्मिक, सामाजिक, साहित्य, कला, क्रीडा, पञकारित, कृषी व शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्र स्वाभिमान गौरव राज्यस्तरीय उत्कृष्ट पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.
यंदाचा पत्रकारितेचा पुरस्कार आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा दै.लोकमत व मराठवाडा साथी वृत्तपत्रांचे तालुका प्रतिनिधी अविनाश कदम यांना जाहिर झाला असून ते मागील पंधरा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात असून राजकीय, सामाजिक शैक्षणिक, सांस्कृतिक, कृषी, कला, क्रीडा, धार्मिक विविध क्षेत्रातील मान्यवरांना प्रकाश झोतात आणण्याचे काम ते मागील पंधरा वर्षापासून करत असून त्यांनी गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचे काम केले आहे. पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार अविनाश कदम यांना जाहीर झाल्याबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातील मान्यवर स्वागत करत असून व सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here