रोखठोक जामखेड….

ग्रामपंचायतमध्ये मुलीच्या पराभवामुळे आलेल्या नैराश्यातून पत्रकारांविषयी जामखेड येथिल कार्यक्रमात आर्वाच्च शब्दात भाषा वापरून पत्रकारांना अपमानित केल्या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला भास्करराव पेरे पाटील यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. ३१ जानेवारी रोजी ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृह मोहा ता. जामखेड येथिल एका कार्यक्रमातील भाषणात स्वतः च्या गावातील पाटोदा ता. जि. औरंगाबाद येथील ग्रामपंचायत निवडणूकीत मुलीच्या झालेल्या पराभवाच्या रागातून पत्रकारांना आर्वाच्च भाषेत तसेच दैनिक दिव्य मराठी व पुण्यनगरी तसेच इलेक्ट्रॉनिक मिडिया एबीपी माझाच्या पत्रकारांविषयी आर्वाच्च भाषा वापरून अपमानित केले होते. तेव्हा जामखेड मधील सर्व पत्रकारांनी एकत्र येत याचा निषेध करत तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
तसेच ४ फेब्रुवारी रोजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे जामखेड मधील पोलीस वसाहतीच्या भूमिपूजन प्रसंगी आलेले आसताना समवेत आमदार रोहित पवार हेही उपस्थित होते. त्यांनाही निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती गृहराज्यमंत्री यांनी पोलीस अधीक्षक यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. यावेळी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष नासीर पठाण, पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक निमोणकर, मिठूलाल नवलाखा, सुदाम वराट, अविनाश बोधले, ओंकार दळवी, प्रकाश खंडागळे, मोहिद्दीन तांबोळी, पप्पू सय्यद, समीर शेख, पिंटू औचरे, दत्तराज पवार, फारूक शेख यांच्या सह अनेक पत्रकार उपस्थित होते. त्यानुसार आज दि. ७ रोजी जामखेड पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक निमोणकर यांच्या तक्रारीवरून जामखेड पोलीसांनी भास्करराव पेरे पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामुळे पत्रकारांनी समाधान व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here