Home क्राईम न्यूज पिकअप मोटरसायकल अपघातात खर्ड्या जवळ तरुण जागीच ठार…

पिकअप मोटरसायकल अपघातात खर्ड्या जवळ तरुण जागीच ठार…

पिकअप मोटरसायकल अपघातात खर्ड्या जवळ तरुण जागीच ठार…
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील कानिफनाथ मंदिराच्या पाठीमागे आसलेल्या गीतेवाडी रस्त्यालगत पीकअप व मोटारसायकल चा आपघात होऊन या आपघात सनी परशुराम रणशिंग वय 24 वर्ष या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. सदरची घटना ही दि 25 एप्रिल रोजी दुपारी घडली आहे. याप्रकरणी पीकअप चालका विरोधात खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की जामखेड तालुक्यातील खर्डा येथे कानिफनाथ मंदिराच्या पाठीमागे गीते वाडी रस्त्याला दि 25 एप्रिल रोजी दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास गाडी चालक याने पीकअप रोडचे कडेला थांबवली होती. यानंतर पाठीमागे येणारे, जाणारे वाहने न पाहता रोडच्या परिस्थिती कडे दुर्लक्ष करून अचानक ही पीकअप गाडी रोडवर घेतली त्यामुळे मोटरसायकलला जोराची धडक बसून यातील मयत नामे सनी परशुराम रणशिंग रा आपटी वय 24 वर्ष या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. सदर तरुणाच्या मृत्यूस व त्याच्या मोटरसायकल च्या नुकसानीस कारणीभूत होऊन अपघाताची खबर न देता चालक पसार झाल्याने त्याचे विरोधात खर्डा पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खर्डा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांनी तातडीने सूत्रे हलवून कोणताही धागादोरा नसताना सुसाट जाणारी पिकअप शोधून रात्री उशिरा खर्डा पोलीस ठाण्यात आणली आहे. सदर गाडीचा नंबर MH 17 AG 8942 असून मोटरसायकल न.MH 14 AC 3539 असा आहे. या घटनेबाबत फिर्यादी सुग्रीव विश्वनाथ मोरे वय 40 वर्ष रा. तेलंगशी तालुका जामखेड यांनी दिनांक 26 रोजी रात्री 7.30 चे दरम्यान फिर्याद दिली आहे. त्यामुळे आरोपी विरुद्ध मोटार वाहन कायद्या नुसार खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृताच्या नातेवाईकांनी खर्डा पोलीस स्टेशनला मोठी गर्दी केली होती. सनी हा तुळजापूर व येरमाळा यात्रेनिमित्त गावाकडे आला होता. देवदर्शन करून तो आपटी या गावावरून आपल्या मामाच्या गावाकडे आपल्या बहिणीला भेटण्यासाठी दिघोळ या गावी चालला होता. सोबत देवदर्शनाहून आणलेला प्रसाद घेऊन जात असताना खर्ड्या जवळील गीतेवाडी फाट्याजवळ त्याचा दुर्दैवी अपघात होऊन मृत्यू झाला.
तो अविवाहित असून एका गरीब कुटुंबातील कर्ता होतकरू तरुण मुलगा मयत झाल्याने रणसिंग कुटुंबावर शोककळा पसरली आहे. सदरील घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांचे मार्गदर्शनाखाली चालू असून हेड कॉन्स्टेबल संभाजी शेंडे, पो. कॉ. शशी म्हस्के, पो.कॉन्स्टेबल बाळू खाडे, अशोक बडे, यांनी निघून वाहनाचा तात्काळ तपास करून वाहन ताब्यात घेतले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!