रोखठोक येरवडा….

कल्याणीनगर वडगावशेरी परिसरात टेम्पोची चोरी करणाऱ्या वाहन चोराला येरवडा पोलिसांनी सापळा रचून अटक केली. संतोष खंडागळे (वय 24, रा. निबंळक, अहमदनगर)याला अटक करण्यात आले असून त्याच्या ताब्यातून दोन टेम्पो हस्तगत करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा पोलीस स्टेशन येथे कल्याणीनगर, वडगावशेरी येथून दोन टेम्पो चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयाचा तपास करताना टेम्पोची चोरी करणारा संतोष खंडागळे अहमदनगर येथे असल्याचे माहिती तपास पथकातील पोलीस कर्मचारी नवनाथ मोहिते, अमजद शेख, अनिल शिंदे यांना मिळाली, त्यानुसार अहमदनगर येथे सापळा रचून त्याला अटक करून चोरीचे दोन टेम्पो हस्तगत करण्यात आले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख, पोलीस निरीक्षक(गुन्हे)अजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर करपे, पोलीस कर्मचारी नवनाथ मोहिते, अमजद शेख, गणपत थीकोळे, गणेश वाघ, दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, अनिल शिंदे, सुनील नागलोत, संजय भरगुडे, राहुल परदेशीं सुनील सकट, अजय पडोळे यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here