रोखठोक जामखेड….

गेल्या अनेक वर्षांपासून खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी व दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आसलेल्या खर्डा परीसरातील दोन आरोपींच्या मुसक्या आवळण्यास जामखेड पोलीसांना यश आले आहे.

या बाबत समजलेली माहिती अशी की दि ७ फेब्रुवारी रोजी गुप्त बातमीदार यांचेकडून पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना माहिती मिळाली की दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जगन्नाथ येडबा जाधव रा. सोनेगाव ता. जामखेड तसेच खुनाचा प्रयत्न या गुन्ह्यातील फरार आरोपी बाळू शिवाजी रावण रा. घोडेगाव ता. जामखेड हे खर्डा परिसरात आली आहेत. माहिती मिळताच ताबडतोब पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी खर्डा दूरक्षेत्र येथील पोलीस अंमलदार पोना शेंडे, पो .कॉ साखरे व मस्के यांना सूचना देऊन रवाना केले .

पोलीस अंमलदार यांनी अत्यंत शिताफीने व ताबडतोब फरार आरोपी बद्दल अधिक माहिती घेऊन खर्डा गावचे शिवारातून ताब्यात घेऊन आरोपीस अटक केली. आरोपीचे नाव जगन्नाथ येडबा जाधव (रा सोनेगाव ता.जामखेड ) यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन गु.र. नं ७५/२०१७ भा . द. वि ३९५ वै प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. व सदर आरोपी चार वर्षापासून फरार झालेला होता तसेच आरोपी बाळू शिवाजी रावण ( रा.घोडेगाव ता. जामखेड )गु.र. नं ३५७ /२०१९ भा.द. वि कलम ३०७ वै /प्रमाणे खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. गेल्या दोन वर्षापासून आरोपी फरार होता . दोन्ही गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात आलेली असून ,अधिक तपास जामखेड पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक सुनील बडे व पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here