जामखेड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापनदिन उत्साहात साजरा
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा रौप्य महोत्सवी वर्धापनदिन आज सोमवार, १० जून रोजी
जामखेड पंचायत समिती समोर सेंट्रल बिल्डिंग राष्ट्रवादी काँग्रेसच्या आँफिस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकावला यावेळी फटाक्यांची आतषबाजी करून एकमेकांना पेढे भरवत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
पक्षाचा २५ वा वर्धापन दिन पक्षफूटीनंतरचा हा पहिलाच वर्धापन दिन आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईमध्ये आपला वर्धापन दिन साजरा केला कार्यालयात ध्वजारोहनही करण्यात आलं होतं. जिल्हा पातळीवर व तालुका पातळीवर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
जामखेड मध्ये वर्धापनदिन साजरा करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेश निमोणकर, तालुका उपाध्यक्ष बापूराव शिंदे, ऋषी कुंजीर, युवराज राऊत, बाप्पू कार्ले, अक्षय म्हेत्रे, अमर निमोनकर, विकास राऊत, विशाल कदम, आकाश बारहाते, अतुल जगताप, विकास वराट, निलेश बिराजदार, उमेश कांबळे, दादा महारनवर, मनोज वराट यांच्या सह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पक्षफूटीनंतरचा अजित पवारांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत जामखेड तालुक्यात सामाजिक कार्यकर्ते प्रा. सचिन गायवळ यांनी तरूणांची मोट एकत्र बांधत जामखेड तालुक्यात चांगल्या प्रकारे संघटना बांधणी केली महेश निमोणकर यांना तालुकाध्यक्ष व बापुसाहेब शिंदे यांना उपाध्यक्ष पदे दिली.
जामखेड पंचायत समिती समोर सेंट्रल बिल्डिंग राष्ट्रवादी काँग्रेसच्या आँफिस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकावला तसेच फटाक्यांची आतषबाजी करत एकमेकांना पेढे भरवत मोठ्या उत्साहात साजरा केला.