एसटी बस-चार चाकी वाहनाच्या अपघातातील आनखी एका युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू
अपघातातील मृतांची संख्या झाली तीन
जामखेड प्रतिनिधी
जामखेड खर्डा रोडवरील काल झालेल्या अपघातातील तिसर्‍या गंभीर जखमी झालेल्या मयुर संतोष कोळी या युवकाचा खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे या अपघातातील मृतांची संख्या ही तीन झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की जामखेड जवळील खर्डा रोडवरील पेट्रोल पंपाजवळ 10 जुन रोजी रात्री बस आणि चारचाकी वाहनाचा भिषण अपघात झाला होता. या अपघातात देवदर्शनाहून परतणाऱ्या चार चाकी वाहनातील दोघांचा मृत्यू झाला होता तर तिघांवर अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
या मध्ये मयुर संतोष कोळी या युवकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याने त्यांच्यावर अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार चालू होते. मात्र आज मंगळवार दि 11 जुन रोजी सकाळी उपचारादरम्यान रुग्णालयात मयुर संतोष कोळी वय 18 वर्षे रा. वडगाव गुप्ता ता.नगर या युवकाचा मृत्यू झाला. त्यामुळे या अपघातातील मृतांची संख्या ही तीन झाली आहे.
मृत्यू झालेले तिघेही हे नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता येथील रहिवासी आहेत. अक्कलकोट व तुळजापूर येथुन दर्शन घेऊन ते जामखेड मार्गे आपल्या चारचाकी वाहणातुन आपल्या नगर येथील वडगाव गुप्ता या गावी चालले होते. या वाहनात एकुण पाच जण प्रवास करत होते. एकुण तीन जणांचा मृत्यू झाला असून दोन जण नगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here