सांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्न
स्व एम. ई.भोरे कॉलेजचे प्रा. दादासाहेब मोहितेंचे सहभाग
महाराष्ट्र राज्य गृह विभाग (पोलीस) व शिक्षण विभागाचे अधिकारांतर्गत महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर,जिल्हा सांगलीच्या वतीने आयोजित करण्यात आलेले राज्यस्तरीय आर एस पी शिक्षक अधिकारी प्रशिक्षण शिबीर दि. १० मे ते १९ मे २०२४ दरम्यान संपन्न झाले.
यामध्ये जामखेड तालक्यातील स्व एम. ई.भोरे ज्युनियर कॉलेजचे सहशिक्षक प्रा. दादासाहेब मोहिते यांचेसह चार शिक्षकांनी सहभाग घेऊन रस्ते अपघात, आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतले. या शिबिरात नैसर्गिक आपत्तीत येणाऱ्या अडचणीत अडचणीत सापडलेल्यांना मदत करणे, अपघात, आग, पुर परस्थिती या प्रसंगात कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत प्रशिक्षण देण्यात आले.
या दहा दिवशीय प्रशिक्षण शिबिरात स्व.एम ई भोरे ज्युनियर कॉलेजचे प्रा. दादासाहेब मोहिते,नान्नजचे मिंड सर, पिंपरखेडचे खताळ सर, व फक्राबादचे वीर सर यांनी सहभाग घेतला. या शिबिराचा तालुक्यातील विद्यार्थ्यी व शाळांसाठी खूप मोठा फायदा होईल. या वेळी आर एस पी चे राज्याचे अध्यक्ष संजय शेंडे, माजी महासमादेशक पितांबर सर, मुख्य प्रशिक्षक पोहरे सर, विभागीय समादेशक सिकंदर शेख, तसेच अहमदनगर जिल्हा समादेशक बोंतले सर यांनी या प्रशिक्षणात विविध प्रकारचे प्रात्यक्षिके सादर केले.