खर्डा व जवळा जिल्हा परिषद गटातून डॉ. सुजय विखे यांना मोठे मताधिक्य देणार – सामाजिक कार्यकर्ते सचिन सर गायवळ

जामखेड प्रतिनिधी

अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील यांचा विजय निश्चित असून माजी मंत्री आमदार प्रा. राम शिंदे साहेब व आमचे नेते उपमुख्यमंत्री अजित (दादा) पवार यांच्या आदेशानुसार जामखेड तालुक्यासह खर्डा जिल्हा परिषद गटातून खासदार सुजय (दादा) विखे पाटील यांना कधी नव्हे एवढे असे भरघोस मतदान देऊन संपूर्ण मतदारसंघात असणाऱ्या खर्डा व जवळा जिल्हा परिषद गटामध्ये भारतीय जनता पार्टीला एक नंबर असे मताधिक्य देऊन व इतिहास घडवू अशी ग्वाही सामाजिक कार्यकर्ते सचिन सर गायवळ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
गेल्या वर्षी झालेल्या जामखेड येथील छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये विरोधी पक्षाच्या पॅनलला आस्मान दाखवून ग्रामपंचायत मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे चारही उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले होते. पुढील विरोधकाच्या पॅनलचा धुवा उडविला होता आमदार प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चारही जागा भरघोस मताने निवडून आणून त्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली होती.
त्याच पद्धतीने आज रोजी होत असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जामखेड तालुक्यातील खर्डा जिल्हा परिषद गटातील व जवळा जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावागावात जाऊन खासदार सुजय (दादा) विखे पाटील यांना जास्तीत जास्त प्रत्येक बूथ वाईज मतदान आणि मताधिक्य देण्यासाठी सर्व युवक कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन बैठका व गाठीभेटी सुरू केल्या असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सचिन सर गायवळ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here