जलजीवन कामाच्या नियोजनामुळे राजुरी ग्रामपंचायतच्या माध्यमातून भागतीय ग्रामस्थांची तहान
जामखेड प्रतिनिधी
राजुरी ग्रामपंचायतचे सरपंच सागर कोल्हे व काकासाहेब कोल्हे यांच्या योग्य नियोजनामुळे प्रभावी जलजीवन राबविण्यात आले यामुळे भर उन्हाळ्यातही राजुरी ग्रामस्थांना सुरळीत व स्वछ पाणीपुरवठा होत आहे.
एकेकाळी राजुरी गावामध्ये पाण्याची खूप मोठी समस्या निर्माण झाली होती. तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली होती. कुठल्याही विहिरीला बोरला पाणी नव्हते. आमदार रोहित पवार यांनी मंजुर करुन दिलेल्या जलजीवन योजनेचे काम सरपंच सागर कोल्हे, युवा नेते काकासाहेब कोल्हे यांनी स्वतः लक्ष घालून केले. राजुरी येथे देवमन पाझर तलाव आहे. या ठिकाणी स्वतःच्या मालकीची जमीन बक्षीस पत्र देऊन याठिकाणी विहीर केली व दुष्काळजन्य परिस्थिती पाहता सागर भाऊ कोल्हे व काकासाहेब कोल्हे यांनी गावालातील सर्व लोकांना विश्वासात घेऊन देवमण तलावातील पाणी उपासा बंद करण्या बाबत घेतलेला योग्य निर्णय ठरला.
यामुळे आज राजूरीकरांना पाणी पुरवठा होत आहे याच विहीर वरून राजुरी येथे जुन्या पाणीपुरवठा विहिरी मधे पाणी टाकून पाणी पुरवठा केला जात आहे व तसेच काही ठिकाणी ग्रामपंचायत पाणीपुरवठ्याची सोय नाही, व जलजिवन योजनेचे काम चालू असल्या कारणाने या ठिकाणी आपले लाडके आमदार रोहीत दादा पवार यांच्याकडे सागर कोल्हे व काकासाहेब कोल्हे यांनी टँकरची मागणी केली.
दादांनी तात्काळ टँकरची व्यवस्था करून दिली, रोहीत दादा मार्फत पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर सुरू केले आहेत. याच विहिरीवर हे टँकर भरले जात आहेत आज आपल्या राजुरी करांना स्वछ पाणी पुरवठा सुरळीत होत आहे. याचे श्रेय प्रभावीपणे राबविण्यात आलेले जलजीवन काम हेच आहे.