जामखेड येथे अहमदनगर लोकसभा निवडणूक संदर्भात वंचित बहुजन आघाडीची बैठक संपन्न
जामखेड प्रतिनिधी
अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणूक संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे जामखेडचे कार्यकर्ते पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली. अहमदनगर दक्षिणमधून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीसाठी जो उमेदवार देतील त्याला जामखेड तालुक्यातुन भरघोष मतदान देवुन निवडुन देण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी गणपत (आबा) कराळे होते. या प्रसंगी ॲड. डॉ.अरुण (आबा) जाधव वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य भटके विमुक्त समन्वय, वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा. प्रा. किसन चव्हाण सर यांची महत्त्वपूर्ण मार्गदर्शनपर भाषणे झाली. यावेळी मा. ॲड डॉ.अरुण (आबा) जाधव म्हणाले. की श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचा जो उमेदवार देतील त्याला जामखेड तालुक्यातुन भरघोष मतदान देवुन निवडुन आणणार हे मात्र निश्चित आहे. साहेब जो उमेदवार देणार त्या उमेदवाराचा गावोगावी जाऊन प्रचार करणार इथला आदिवासी, भटके विमुक्त, गरीब मराठा, ओ.बी.सी मुस्लिम समाजाच्या मतावर उमेदवार निवडून आणणार मा. प्रा. किसन चव्हाण सर आपल्या भाषणात म्हणाले की अहमदनगर दक्षिण व उत्तर मतदार संघातून भाजपा हद्दपार करण्याचा ठाम निर्णय वंचित समुहाने घेणे गरजेचे आहे. आणि मला खात्री आहे. की अहमदनगर दक्षिणमधून वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार भरघोस मतांनी निवडून येणार असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी बापूसाहेब ओहोळ प्रवक्ते लोकाधिकार आंदोलन, प्रतीक (दादा) बारसे जिल्हाध्यक्ष दक्षिण वंचित बहुजन आघाडी, भीमराव चव्हाण वंचित बहुजन आघाडी अहमदनगर दक्षिण संघटक, सुरेखाताई सदाफुले भारतीय बौद्ध महासभेच्या तालुका अध्यक्ष, उत्तमराव सावंत नाथपंथी डवरी गोसावी समाजाचे जिल्हाध्यक्ष, वैजनाथ केसकर धनगर समाज नेते, विशाल पवार आदिवासी नेते, संतोष चव्हाण, द्वारकाताई पवार आदिवासी नेत्या, या सर्वांचे मनोगते झाली.
या बैठकीस अजहर काजी मुस्लिम नेते, सय्यद मुक्तार जनता टेलर, योगेश सदाफुले, भीमराव सुरवसे वडार समाज नेते, डॉ. खलीलभाई शेख, रंजन (नाना) मेघडंबर, कल्याण आव्हाड ग्रा.पं. सदस्य जवळा, मुकुंद घायतडक मास्टर, सर्जेराव गंगावणे सरपंच बाळगव्हाण, सागर ससाने वंचित बहुजन आघाडी उपाध्यक्ष जामखेड, बाबा कांबळे, मा.हुसेन मदारी, मोहन चव्हाण, मोहन शिंदे, रेश्माताई बागवान, बाळू लोखंडे, संतोष पवार, रवींद्र जाधव, अरविंद जाधव, मच्छिंद्र अण्णा जाधव, प्रकाश सावंत, भारत सावंत व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी महीला भगीणींचा सहभाग लक्षणीय होता. या बैठकीचे सूत्रसंचालन जामखेड वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष अजिनाथ शिंदे यांनी केले. तर सर्व उपस्थितांचे आभार जामखेड वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष अतिश पारवे यांनी मानले.