रोखठोक जामखेड…..

गेल्या महिन्यात जामखेड शहरात कोरोना रुग्णांची संख्या शुन्य झाली होती. मात्र शहरासह तालुक्यात येत्या दहा दिवसांत तब्बल आठ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता तरी नागरीकांनी सोशल डिस्टन्सिंग व मास्क वापरण्याचे अवहान प्रशासनाकडु करण्यात आला आहे.

राज्यातील कोरोना व्हायरसच्या साथीने काही काळ विश्रांती घेतल्यानंतर आता पुन्हा हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रातील विदर्भ-मराठवाड्याच्या ग्रामीण भागांमध्येही कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. याचाच परीणाम जामखेड तालुक्यात देखील दिसुन येत आहे. गेल्या महिन्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची शुन्य झालेली आकडेवारी दिलासादायक ठरली आसली तर तब्बल दहा ते बारा दिवसात जामखेड शहरासह तालुक्यात कोरोना बाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आसल्याचे आढळून आले आहे. तब्बल बारा दिवसात आठ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. ग्रामीण भागात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने याबाबत प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे. कोरोनाचे आकडे पुन्हा वाढत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर आरोग्य प्रशासन आता खडबडून जागं झालं आहे.

मागिल दिड महीन्यांपासून 1751 जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली. या मध्ये फक्त 17 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले होते. मात्र मागील दहा दिवसात आठ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याने ही जामखेडकरांसाठी चिंता वाढवणारी गोष्ट आहे. पुढील पंधरा दिवस आणखी धोक्याचे आसुन नागरीकांनी मास्क व सोशल डिस्टन्सिंग पाळणे पाहीजेत अन्यथा लॉकडाऊन शिवाय पर्याय रहाणार नाही अशी माहिती जामखेड चे तालुका अरोग्य अधिकारी डॉ सुनील बोराडे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here