रोखठोक अहमदनगर…….

जिल्हा सहकारी बॅकेच्या चार जागांची मतमोजणी झाली असून सर्वांचे लक्ष लागलेल्या जागेवर माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले निवडून आले आहेत. विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातून शिवाजी कर्डिल, उदय शेळके, विजय पिसाळ निवडून आले आहेत.

जिल्हा सहकारी बॅकेच्या नगर विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातून शिवाजीराव कर्डिले 94 मतांनी विजयी झाले आहेत.तर पारनेर तालुक्यातून उदय शेळके हे 99 मतांनी विजयी झाले आहेत. कर्जत तालुक्यातून अंबादास पिसाळ यांना 37 तर मीनाक्षी साळुंके यांना 36 मते पडली आहेत. निकालानंतर जिल्हा बॅकेच्या आवारात उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. बिगर शेती मतदारसंघातून राष्ट्रवादीचे प्रशांत गायकवाड हे पहिल्या फेरीअखेर एकशे दहा मतांनी आघाडीवर आहेत. प्रशांत गायकवाड गायकवाड यांना 387 तर दत्ता पानसरे यांना 273 मते मिळाली आहेत. बिगरशेती मतदारसंघातून पारनेरचे महा विकास आघाडीचे उमेदवार प्रशांत गायकवाड हे 189 मतांनी विजयी झाले असून भाजपचे दत्ता पानसरे यांना 574 मते मिळाली आहेत.

विविध कार्यकारी सोसायटी :

पारनेर – उदय शेळके (विजयी, मतदान- 99
रामदास भोसले -6 मते

नगर – शिवाजी कर्डिले ( विजयी- 94 मते)
सत्यभामा बेरड -15 मते

कर्जत – अंबादास पिसाळ (विजयी-37)
मीनाक्षी साळुंके-36

बिगरशेती संस्था
प्रशांत सबाजी गायकवाड ( विजयी- 763)
दत्ता पानसरे – 574

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here