जितेंद्र आव्हाडांनी आ. रोहित पवारांना झापलं, म्हणाले, पहिल्या टर्मचा आमदार, अबूधाबीत बसून बोलणं सोपं!
शिर्डी : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रोहित पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय. प्रभू श्रीरामासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा भूमिका स्पष्ट केली. त्यावेळी त्यांनी रोहित पवार यांच्या ट्वीटचाही समाचार घेतला. रोहित पवार पहिल्या टर्मचा आमदार आहे, त्यांच्याकडे मी फारसं लक्ष देत नाही. अबूधाबीत बसून बोलणं सोपं असतं, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डी येथील पक्षाच्या शिबिरात रामाच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या संदर्भात रोहित पवार यांनी ट्विट करत मत व्यक्त केले होते. राज्यातील महत्वाचे मुद्दे सोडून देव आणि धर्म यावर बोलणं सोडल पाहिजे. देव आणि धर्म ही वैयक्तिक भावना असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले होतं. याला आता जितेंद्र आव्हाड यांनी सडेतोड उत्तर दिलेय.
रोहित पवारांबद्दल काय म्हणाले आव्हाड ?
रोहित पवार यांच्याबाबत मी बोलणार नाही, रोहित पवार काय बोलतात. याकडे मी लक्ष देत नाही. ते लहान आहेत. त्यांची आमदारकीची पहिली टर्म आहे. अबुधाबी मध्ये जाऊन रोहित पवार यांना तिथून बसून बोलणं सोप्प आहे, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.

रोहित पवार काय म्हणाले होते ?

आज नको त्या विषयावर बोलून वाद ओढवून घेण्यापेक्षा राज्यातील वाढती बेरोजगारी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, महिलांची सुरक्षितता, शेतमालाला भाव नसणं, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणं, जाती-जातींमध्ये निर्माण केला जाणारा तणाव या ज्वलंत विषयांवर बोलून सरकारला धारेवर धरण्याची अधिक गरज आहे. देव आणि धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय असून.. याबाबत प्रत्येकाची श्रद्धा असल्याने कुणीही याचं राजकारण करू नये, पण देव धर्माच्या नावावर जे राजकारणाचा बाजार करतात त्यांना ते लखलाभ.. अशा राजकीय व्यापाऱ्यांना जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही.. त्यामुळं देव या विषयावर अनावश्यक बोलून विरोधकांच्या सापळ्यात न अडकण्याचं भान सर्वांनीच ठेवलं पाहिजे, अशी एक नागरिक म्हणून माझी भावना आहे!
मी कुठलंही भाष्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही : जितेंद्र आव्हाड
“अन्न पुराणी नावाचा पिक्चर आला आहे. 1 डिसेंबर 2023 ला. दक्षिणेतील सुपरस्टार दोघे त्यामध्ये आहेत. त्यामध्ये त्यांनी पाठांतर वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणातील श्लोक म्हणून दाखवला आहे. मी कुठलंही भाष्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही. पण त्याही वरती मी जाऊन सांगतो, आजकाल अभ्यासाला महत्व नाही, भावनांना महत्व आहे. त्यावर मी म्हणेन, माझ्या कालच्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो.”, असं आव्हाड म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here