रोखठोक न्यूज…….

जामखेड शहराच्या सुशोभीकरणा बरोबरच चांगले रस्ते, बागबगीचा , क्रिंडागणे व अभ्यासिका लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. येत्या तीन वर्षांत जामखेडचा चेहरा बदलून स्वच्छ जामखेड सुंदर जामखेड बनवायचे आहे. येणाऱ्या पाहुण्यांना जामखेड मध्ये आले की हरवल्या सारखे वाटेल असे मत आ. रोहित पवार यांनी व्यक्त केले.

जामखेड नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत जामखेड शहर स्वच्छ सर्वेक्षणात पहिल्या पाच मध्ये कसे येईल यासाठी लोकसहभाग वाढवण्यासाठी नुकतेच ल. ना होशिंग विद्यालयात माझी वसुंधरा अभियान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अक्षया देवधर, सामाजिक कार्यकर्त्या सुनंदाताई पवार, प्रांताधिकारी व जामखेड नगरपरिषदेच्या प्रशासक अर्चना नष्टे, केंद्र शासनाचे स्वच्छता दूत गणेश शिंदे, कर्जत चे मुख्याधिकारी गोविंद जाधव, जामखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते, पं. स चे सभापती सुर्यकांत मोरे, कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, माजी सभापती सुभाष अव्हाड, सामाजिक कार्यकर्ते व सावळेश्वर ग्रृप चे संचालक रमेश आजबे, नगरसेवक अमित जाधव. दिगंबर चव्हाण. पवन राळेभात. प्रा लक्ष्मण ढेपे, मोहन पवार, इस्माईल सय्यद, अमोल गिरमे, मनोज भोरे. राजु गोरे, राजेंद्र पवार, उमर कुरेशी, इम्रान कुरेशी सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

स्वच्छतेची सुरवात करायची आहे, मात्र यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. कारण लोकसहभागा शिवाय आपण काहीच करू शकत नाही. त्यामुळे या अभियानात लोकांचा सहभाग खुप महत्वाचा आहे. विधानसभा निवडणुकी नंतर कर्जत – जामखेड चे नाव महाराष्ट्र झाले आहे मात्र त्याच प्रमाणे स्वच्छतेच्या बाबतीत देखील जामखेड चे नाव महाराष्ट्रात झाले पाहिजे. कर्जत प्रमाणे जामखेड शहर देखील स्वच्छता अभियानात एक नंबर करायचे आहे. यासाठी आपल्या लोकसहभागाची गरज आहे. नागरीकांना बसण्यासाठी 150 बँन्चेस कर्जत जामखेड डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून जामखेड शहरात बसवण्यात येणार आहेत.

अभिनेत्री अक्षया देवधर म्हणाल्या की, प्रत्येकाने आपल्या घरापासून स्वच्छतेला सुरूवात करा लहान मुलांना स्वच्छतेची सवय लावा मी परत जामखेड शहर पाहण्यासाठी येणार आहे. आ. रोहित पवार हे जामखेडच काय संपूर्ण महाराष्ट्रात स्वच्छता अभियान राबवु शकतात मग जामखेड तर खुप सहज स्वच्छ सर्वेक्षणात पहीले येईल मात्र त्यांना जामखेडकरांची साथ महत्त्वाची आहे आणि ती तुम्ही द्यायची आहे. यावेळी केंद्र शासनाचे स्वच्छता दूत गणेश शिंदे यांनी स्वच्छता व शौचालय याचे महत्त्व सांगितले.

या नंतर जामखेड चे मुख्याधिकारी म्हणाले की आ. रोहित पवार हे जामखेड शहरासाठी दहा ते बारा फुट उंचीचे पाच हजार झाडे देणार आहेत, शहरातील सार्वजनिक शौचालय स्वच्छ करण्याचे काम हाती घेतले आहे. स्वच्छ जामखेड, हरीत जामखेड व सुंदर जामखेड करायचे असेल तर आपल्या घरातील कचरा हा घंटा गाडीत टाका सहकार्य करायचे आहे. लोकचळवळ वाढावी म्हणून वेगवेगळ्या सामाजिक संस्था व पदाधिकारी यांना स्वच्छ सर्वेक्षण चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले.

कर्जत नगर पंचायतीचे मुख्याधिकारी गोविंद जाधव, बिजेएसचे जिल्हाध्यक्ष आशिष बोरा यांनी देखील आपले मनोगते व्यक्त करत कर्जतकरांच्या स्वच्छ कर्जत अभियानाची माहिती दिली. कर्जत येथील साठ तरूण स्वच्छतेचा संदेश देत कर्जत ते जामखेड सायकलवर जामखेड मध्ये आले होते. या सायकल रॅलीमध्ये
कर्जत चे मुख्याधिकारी देखील सहभागी झाले होते. सायकल रॅलीचे उद्दिष्ट म्हणजे स्वच्छता ही लोकचळवळ व्हावी असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here