रोखठोक जामखेड….
शहरातील दोन्ही बाजुनीं आसलेल्या नदीच्या सुशोभिकीकरणासाठी शासनाकडे नीधी मिळवण्यासाठी नविन प्रस्ताव तयार करून पाठवला आहे. त्यामुळे लवकरच धाकटी नदी व विंचरणा नदीचे रुपडे पालटणार आहे कारण विंचरणा नदी ही सर्वांसाठी गंगा आहे.
विंचरणा नदीपात्राच्या कडेला तयार करण्यात आलेली भव्य दिव्य अशी भगवान शंकराची 21 फुटी उंची असलेली मुर्तीचे अनावरण दि 15 रोजी
आमदार रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. दि 14 रोजी देखील ग्रामस्थांच्या हस्ते पाठपुजा करण्यात आली होती. या वेळी पांडुरंग शास्त्री देवा, सामाजिक कार्यकर्त्या सुनंदाताई पवार, पं. स चे सभापती सुर्यकांत मोरे, माजी जि. प. सदस्य मधुकर राळेभात. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, शिल्पकार प्रमोद कांबळे, राजेंद्र कोठारी, उपमहाराष्ट्र केसरी बबनकाका काशिद, सामाजिक कार्यकर्ते व सावळेश्वर ग्रृप चे संचालक रमेश आजबे, नगरसेवक अमित जाधव. दिगंबर चव्हाण. पवन राळेभात. प्रा लक्ष्मण ढेपे, मोहन पवार, सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना आ. रोहित पवार म्हणाले की शहरातील सौंदर्यात भर घालण्यासाठी नदीचे सुशोभिकीकरण झाले पाहिजे. या ठिकाणी नदीच्या दोन्ही बाजूला रस्ते, लहान मुलांना खेळण्यासाठी जागा, व नागरीकांना फीरण्यासाठी जॉगिंग ट्रॅक सह इतर सुविधा करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव तयार करून पाठविला आहे त्याला देखील लवकरच मंजुरी मिळेल असे सांगितले.
जामखेड नगरपरिषदेच्या नवीन कार्यालयासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तसेच येत्या दहा ते पंधरा दिवसात जामखेड ते श्रीगोंदा या चारपदरी रस्त्याचे काम सुरू होणार आहे. तसेच पुढील काही दिवसात जामखेड येथील नविन बस स्थानकाचे देखील भुमीपुजन होणार आहे महाराष्ट्रात सर्वाधिक चांगल्या दर्जाचे हे बस स्थानक आसणार आहे. जामखेड नगरपरिषदेचे देखील नवीन कार्यालय होणार असुन त्यासाठी जागा निश्चित करण्याचे काम सुरू आहे. शंकराच्या मुर्ती चे अणावरन झाले असून तालुक्यात देखील खर्डा परीसरातील जातेगाव रोडवरील गीते बाबा मंदिर या ठिकाणी भगवान बाबा व गीते बाबा यांची चार फूट मुर्ती तर सिताराम गडावर पांडुरंगाची सहा फुट मुर्ती बसवण्यात येणार असुन या मुर्ती बसवण्याचे काम देखील नगरचे प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांना देण्यात आले आहे.