आ. निलेश‌ लंकेचे जामखेड दौरै वाढले, राजकीय चर्चांना उधाण
नगर दक्षिण मतदार संघात दिवसेंदिवस वाढत्या लोकप्रियतेचे दर्शन
जामखेड प्रतिनिधी
राजकीय नेत्यांच्या फराळाला कार्यकर्ते जातात हे नेहमीच बघायला मिळतं. पण कार्यकर्त्याच्या फराळ कार्यक्रमाला नेता जाणे हे कधीतरीच घडतं त्याचा प्रत्येय जामखेड येथे कार्यकर्त्यांनी अनुभवला तो संपुर्ण राज्यात आरोग्यदुत म्हणून परिचित असलेले आ. निले लंके साहेब यांच्या माध्यमातून आ. निलेश लंके हे जामखेड येथील हॉटेल सेलिब्रेशन्स उद्घाटन समारंभसाठी आले असता त्यांनी प्रा. लक्ष्मण ढेपे यांच्या निवास्थानी दिवाळी फराळ निमित्त सदिच्छा भेट दिली व दिवाळी फराळाचा मनमुराद अस्वाद घेतला.

यावेळी जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर, प्रा लक्ष्मण ढेपे, राष्ट्रीय काँग्रेसचे युवक नेतृत्व राहुल उगले, मुस्लिम परिषदेचे अजहर काझी, खलील मौलाना, मोहन पवार, जमीर बारूद, प्रा. जाकिर शेख, जनता टेलर्स, पवन राळेभात, शामिर सय्यद, भरत जगदाळे, उमर कुरेशी, ,भोसले सर, संतोष गव्हाळे, राणा सदाफुले, आशिफ शेख, मंजर भाई, कल्लुचाचा, शेरखान भाई, नागनाथ मुरुमकर, भैया पठाण, भैया तांबोळी, इम्रान कुरेशी, वसीम मंडप, रुषी मीटके, संतोष वारे (ZP सदस्य करमाळा), प्रि. विक्की घायतडक, प्रितम घायतडक, पुरुषोत्तम गव्हाळे, राजेंद्र गोरे, इस्माईल सय्यद, रुषीकेश नेटके, फिरोज बागवान, आज्युशेठ काझी, सज्जाद पठान आदी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

आ. निलेश लंके हे आगामी लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण मतदारसंघात उमेदवारी करण्यासाठी तयारी करत असून त्यांचे जामखेड तालुक्यात वाढते दौरे भुवया उंचावणारे आहेत. या पुर्वीचा दौरा त्यांनी आ. राम शिंदे यांच्या निवासस्थानी झालेल्या दिवाळी फराळाचे वेळी केला होता. त्यावेळी अनेक राजकीय चर्चा झाल्याचे जामखेड करांनी पाहिले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here