नगर जामखेड रोडवरील पोखरी येथे कार झाडावर आदळुन दोघांचा जागीच मृत्यू, दोन गंभीर जखमी
जामखेड प्रतिनिधी
शिर्डीहुन तुळजापूर येथे देवदर्शनासाठी चाललेल्या कारचा नगर जामखेड रोडवरील पोखरी गावाजवळ चालकाचा ताबा सुटल्याने कार झाडावर आदळुन दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. सदरचा आपघात आज सकाळी आकरा वाजण्याच्या सुमारास घडला. याच रोडवर एकाच महिन्यात दुसरा आपघात घडला आहे.
या अपघाताबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कारमध्ये प्रवास करणारे हे शिर्डी येथिल रहीवाशी आसल्याची माहिती मिळाली आसुन हे सर्वजण शिर्डी वरुन तुळजापूरला देवदर्शनासाठी चालले होते. मात्र त्यांची कार नगर जामखेड रोडवरील जामखेड पासून काही आंतरवर आसलेल्या आष्टी तालुक्यातील पोखरी गावाजवळ आली आसता चालकाचा स्टेअरिंग वरील ताबा सुटल्याने एम.एच.०३ बीसी ६७३६ या क्रमांकाची कार रस्त्याच्या कडेला असलेल्या जांभळीच्या झाडावर आदळल्याने भीषण अपघात झाला.
या अपघातात महीला प्रवासी अनिता राहुल इंगोले वय वर्षे ३३ व चालक रुपेश बबन भेंडे चालक रा. शिर्डी यांचा जागीच मृत्यू झाला. तर अनुप राहूल इंगोले वय १४ व अभय राहुल इंगोले वर्ष १२ वर्षे हे या आपघात गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने खासगी दवाखान्यात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. अपघात ग्रस्तांना परिसरातील तरुण नागरीकांनी मदतकार्य केले जखमींना तातडीने उपचारासाठी आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, पोह काळे, पोलिस बब्रुवान वाणी, चालक कन्हेरे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन मदत केली.
एका महीन्यात दुसरा आपघात….
नगर जामखेड रोडवरील पोखरी फाट्या जवळ आष्टा फटा या ठीकाणी मागिल महीन्यात दि २६ ऑक्टोबर रोजी देखील सकाळी सहा वाजता सागर ट्रॅव्हल्स चा पल्टी होऊन भिषण आपघात झाला होता. या मध्ये सहा जणांचा मृत्यू झाला होता. या नंतर एका महीन्यात याच ठिकाणी थोड्या थोड्या आंतरावर आसलेल्या रोडवर पुन्हा भिषण आपघात होऊन दोन जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.