शिवा संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे जामखेड येथे केले स्वागत
जामखेड प्रतिनिधी
जामखेड मध्ये येणारे शिवा संघटना पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे जय शिवा जय शिवा म्हणत जामखेड येथिल शिवा संघटन जिल्हा उपअध्यक्ष तथा भाजपा शहर उपअध्यक्ष शिवकुमार डोंगरे यांनी स्वागत केले.
शिवकुमार डोंगरे हे गेल्या 10 वर्षापासून ही सेवा करत आहेत. दर वर्षी प्रमाणे कार्तिक शुद्ध पौर्णिमेला शिवा संघटनेच्या मागणीनुसार संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांच्या संजीवन समाधी कपिलधार येथे शासकीय महापूजा होते. त्यानंतर संघटनेचा राज्यव्यापी महामेळावा होत असतो. मनोहर धोंडे सर यांच्या अध्यक्ष ते खाली महा मेळावा असतो. याच प्रमाणे याही वर्षी श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराजाची 22 वी शासकीय महापूजा व 28 वा राज्य व्यापी महामेळावा रविवार दिनांक 26/11 2023 प्रमाणे श्री श्रेत्र कपिलधार येथील शिवा मैदानावर होत असतो या वेळी उपस्थित शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री व इतर आमदार खासदार उपस्थित असतात त्याचप्रमाणे गुरुवर्य अनेक शिवाचार्य शिवा संघटनेतील पदाधिकारी कार्यकर्ते वीरशैव समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित असतात.