तालुक्यातील यागावात आढळला बिबट्या वहिरीत , पिंजरा सोडुन बिबट्याला काढण्याचे प्रयत्न सुरू
जामखेड प्रतिनिधी
तालुक्यातील अरणगाव येथील नवनाथ श्रीरंग पारे यांच्या विहीरीत काल मध्यरात्री च्या सुमारास बिबट्या विहीरीत पडला आहे. सकाळी परीसरातील शेतकर्यांना विहीरीत बिबट्या पडला असल्याचे लक्षात आले. यानंतर घटनास्थळी वनविभागाचे कर्मचारी दाखल झाले आसुन वनविभागाच्या मदतीने विहीरीत पिंजरा सोडुन बिबट्याला बाहेर काढण्यात काम सुरू आहे .
घटनेची माहिती मिळताच अरणगावचे सरपंच लहु शिंदे, अंकुश शिंदे, उपसरपंच आप्पा राऊत, ग्रामपंचायत सदस्य तात्याराम निगुडे, रमजान शेख, गोवर्धन राऊत, कैलास निगुडे, कैलास म्हस्के, अर्जुन निगुडे, विष्णू निगुडे व गावकरी यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली. तसेच वनविभागाचे वनरक्षक अजिनाथ भोसले, वनसेवक संजय आडसूळ शरद सुर्यवंशी, बबन महारनवर यांचे पथक दाखल झाले आहेत .
नवनाथ श्रीरंग पारे यांच्या विहीरीत मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या विहीरीत पडला असल्याची माहिती अरणगाव परीसरात पसरताच त्या ठिकाणी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. सदरची विहीर ही अंदाजे पन्नास फुट खोल आसुन पंधरा ते वीस फूट पाणी आहे. हा बिबट्या विहीरीत बाजुच्या कपारीत दडून बसला आहे.
घटनास्थळी वनविभागाचे कर्मचारी दाखल झाले आसुन वनविभागा कडुन अरणगाव येथील घटनास्थळी पिंजरा मागविण्यात आला आहे. बिबट्याला बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थ व वनविभागाचे कर्मचारी प्रयत्न करत आहेत. मात्र बघ्यांची गर्दी खुप आसल्याने बिबट्याला बाहेर काढण्यात आडचणी येत आहेत. वनविभागाचे उपविभागीय वनाधिकारी मोहन शेळके यांनी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. अंधारात फिरू नये, उजेड असावा तसेच हातात नेहमी काठी असावी. आपल्या पशूंची काळजी घ्यावी आसे आवाहन केले आहे.